विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये ५०.७२ कोटी रुपये इतका ढोबळ नफा मिळविलेला असून २५.९२ कोटी बँकेला निव्वळ नफा झाला आहे.बँकेच्या ग्राहकांनी दाखविलेला विश्वास आणि कायमस्वरूपी बँकेशी ठेवलेले नाते यामुळे दिवसेंदिवस बँक प्रगती करीत असून ग्राहक आणि बँक कर्मचारी यांचे समन्वयाचे नाते हेच बँकेच्या प्रगतीचे खरे गमक आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले. बँकेचे उल्लेखनीय कामगिरी करणारे कर्मचारी, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, बँकेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभेमध्ये सर्व ठरावांवर चर्चा होऊन सर्व ठराव सर्वसंमतीने मान्य केले. ग्रामीण भागात अधिक बँकेचे जाळेमजबूत करणे, गोडाऊन योजनेचा विस्तार करणे असे नियोजन असल्याचे पाटील यांनी सांगितले. स्वनिधी ३२५ कोटींवरून ५०० कोटींवर नेण्याचा मानस बँकेने आपला स्वनिधी ३२५.६० कोटी रुपये इतक्या मोठ्या प्रमाणावर नेऊन बँकेची आर्थिक स्थिती भक्कम केली आहे. बँकेचा स्वनिधी ५०० कोटींच्या पुढे नेण्यासाठी पुढील दोन वर्षांमध्ये प्रयत्न केले जाणार असून बँकेचा ढोबळ एनपीए शून्य टक्के करण्याचा मानस सुद्धा त्यांनी व्यक्त केला. बँकेमध्ये आजवर १९००.८२ कोटींच्या ठेवी आणि १०४२.९६ कोटींचे कर्ज वाटप केले आहे.शेती कर्जवाटपामध्ये लाखापेक्षा अधिक वाटपबँकेने गेल्या आर्थिक वर्षामध्ये राज्यातील आणि देशातील बँकांच्या कामगिरीमध्ये आपले यश मिळविताना अनेक पारितोषिके पटकाविली, तसेच जिल्ह्यातील शेतकरीवर्गाला शेती अल्पमुदत कर्जवाटपामध्ये लक्ष्यांकापेक्षा अधिक कर्ज वाटप केले असून कर्जाची वसुली देखील उत्तम प्रकारे केली आहे.बँकेने या वर्षी आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखत अ आॅडिट वर्ग मिळविलेला आहे. या सर्व बाबी जिल्हा मध्यवर्ती बँकेला भूषणावह आहेत, असे आ.पाटील म्हणाले.
आरडीसी बँकेला ५० कोटींचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 3:31 AM