शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

पेणमधून ५० हजार इकोफ्रेंडली गणेशमूर्ती रवाना; पावसाळ्यापूर्वी परराज्यांतील  ऑर्डर पूर्ण करण्याला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 11:39 PM

पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळेमध्ये इकोफ्रेंडली मूर्तींची मागणी वाढली आहे. पर्यावरणपूरक छोट्या व मध्यम उंचीच्या मूर्तींना परराज्यातील गणेशभक्तांकडूनही पसंती दर्शवण्यात येत आहे.

- दत्ता म्हात्रेपेण : पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळेमध्ये इकोफ्रेंडली मूर्तींची मागणी वाढली आहे. पर्यावरणपूरक छोट्या व मध्यम उंचीच्या मूर्तींना परराज्यातील गणेशभक्तांकडूनही पसंती दर्शवण्यात येत आहे. या मूर्तींच्या वितरणाला पेणमधून सुरुवात झाली असून पावसाळ्यापूर्वी मूर्ती त्या त्या राज्यांत पोहोचतील, याची दक्षता मूर्ती कार्यशाळांमधून घेण्यात येत आहे. सध्या आगाऊ नोंदणीनुसार गोवा, गुजरात, कर्नाटक, दिल्ली, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यामध्ये इकोफ्रेंडली (शाडू मातीच्या) मूर्ती रवाना झाल्या आहेत. गोवा व गुजरात राज्यातील गणेशभक्तांकडून यंदा इकोफ्रेंडली गणेशमूर्तींना मोठी मागणी असल्याचे मूर्तिकार मंगेश हजारे यांनी सांगितले.यंदा गणेशोत्सव २ सप्टेंबर २०१९ रोजी असून कार्यशाळामध्ये नोंदविलेल्या आॅर्डर्स पूर्ण करण्याकडे मूर्तिकारांचा कल सुरू झाला आहे. पावसाच्या आगमनापूर्वी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती त्या - त्या राज्यामध्ये पोहचविणे, हे मूर्तिकारांना व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. इकोफ्रेंडली गणेशमूर्ती नाजूक असल्याने त्या मूर्तीचे तूटफूट न होता ती आॅर्डर पोहच करण्यासाठी वितरण व्यवस्थेमधील अनुकूल अशा बाबींचा अभ्यास करून मे महिन्यातच या मूर्ती मागणीनुसार राज्याकडे रवाना केल्या जातात. पेणमधील प्रमुख कलाकेंद्रासह कोंबडपाडा, साई मंदिर, नंदीमाळनाका, कापुरबाग या परिसरातील कार्यशाळांमधून इकोफ्रेंडली गणेशमूर्ती ट्रकमधून विशिष्ट पॅकिंगसह रवाना केल्या जात आहेत.आतापर्यंत साधारणपणे ५० हजार इकोफ्रेंडली गणेशमूर्ती गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यामध्ये पोहच झाल्याची माहिती कार्यशाळेतील सूत्रांनी दिली. पेण शहरासह ग्रामीणमधील हमरापूर, तांबडशेत, जोहे, कळवे या ठिकाणच्या कार्यशाळांमध्ये सुद्धा शाडूच्या गणेशमूर्ती न रंगविता आॅर्डरनुसार पोहच केल्या जात आहेत. पेणमधील तब्बल २५० कार्यशाळांमध्ये शाडूच्या गणेशमूर्ती बनविल्या जातात. यंदा अंदाजे दीड ते दोन लाख इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याकडे मूर्तिकारांचा कल आहे. यामूर्ती पाऊण फूट, एक फूट, दोन फूट व तीन फूट अशाच उंचीच्या साचेबद्ध बनविल्या जातात.ने - आण करण्यासाठी सुलभ अशी या गणेशमूर्तीची रचना असते.दररोज आठ-दहा गाड्यांमध्ये मूर्ती रवानाकमी उंचीच्या छोट्या व मध्यम आकाराच्या गणेशमूर्ती शाडू मातीपासून बनविल्या जातात. पेणच्या कार्यशाळामध्ये यंदा इकोफ्रेंडली गणेशमूर्तींना प्रचंड मागणी आहे. त्या अनुषंगाने यंदा मे अखेरपर्यंत इकोफ्रेंडली गणेश मूर्तींचे देशभरात वितरण करण्याकडे गणेश मूर्तिकारांचा कल दिसून येत आहे. सध्या पेणमध्ये दररोज आठ ते दहा गाड्या भरून इकोफ्रेंडली गणेशमूर्ती वितरण सुरू आहे.

टॅग्स :Raigadरायगड