५०० महिला शेतकरी खाडीत आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 06:38 AM2018-04-07T06:38:37+5:302018-04-07T06:38:37+5:30
अकरा गावांतील सुमारे दोन हजार कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. पेण तालुक्यातील माचेला-ढोंबी गावच्या खाडी किनारी असलेल्या समुद्र संरक्षक बंधाऱ्यास २०१५ मध्ये उधाणाच्या भरतीमुळे भगदाडे पडून समुद्राचे खारे पाणी २७०० एकर भातशेती जमिनीत घुसून त्या जमिनी नापीक झाल्या.
- जयंत धुळप
अलिबाग - अकरा गावांतील सुमारे दोन हजार कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. पेण तालुक्यातील माचेला-ढोंबी गावच्या खाडी किनारी असलेल्या समुद्र संरक्षक बंधाऱ्यास २०१५ मध्ये उधाणाच्या भरतीमुळे भगदाडे पडून समुद्राचे खारे पाणी २७०० एकर भातशेती जमिनीत घुसून त्या जमिनी नापीक झाल्या. अनेक चर्चा, विनंत्या, आंदोलने,उपोषणे करून देखील गेल्या तीन वर्षांत संबंधित जेएसडब्ल्यू कंपनी वा शासन यापैकी कुणीही फुटलेल्या संरक्षक बंधाºयाची दुरुस्ती केली नाही. या साºया परिस्थितीस कंटाळून अखेरचा पर्याय म्हणून, येत्या १७ एप्रिलपर्यंत फुटलेल्या संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्ती कामास प्रारंभ झाला नाही, तर त्याच फुटलेल्या बंधाºयातून वाहणाºया खाडीच्या पाण्यातच ठिय्या देऊन बसून राहाण्याचा निर्णय घेतला आहे.
संरक्षक फुटीने बाधित झालेल्या आनंदनगर, देवळी, जुई, खारपाले, मौजेपाले, म्हैसबाड, ढोंबी जांभेळा, चीर्बी, घात, माचेला या अकरा गावांतील महिला शेतकºयांच्या निर्णय मेळाव्याचे आयोजन गुरुवारी खारपाले गावात कष्टकरी महिला आघाडी, खारडोंगर मेहनत आघाडी, हांदेकरी महिला, जोळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सुनंदा चवरकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी पांडुरंग तुरे,मंजुळा पाटील,काराव ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन पाटील, सदस्या प्रतिभा म्हात्रे, दर्शन पाटील, प्रतिभा कोठेकर, सुरेखा ठाकूर, अमिता ठाकूर, धा. म. पाटील, रघुनाथ माधवी आदी उपस्थित होते, अशी माहिती या शेतकरी लढ्याचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
फुटलेल्या संरक्षक बंधाºयाजवळील शासकीय जमीन स.नं.९४ बाबत हरित न्यायालयात दाखल एक याचिका, कांदळवने अशी कारणे पुढे करून जेएसडब्ल्यू कंपनीने वा शासनाने बंधारा दुरुस्तीचे काम गेल्या २७ नोव्हेंबर २०१५ पासून केले नाही. परिणामी फुटलेल्या संरक्षक बंधाºयांतून या ११ गावांच्या शेतजमिनीत खाडीमधून दर अमावस्या व पौर्णिमेच्या उधाणाला खारे पाणी शिरत आहे.
दोन हजारच्या वर कुटुंबांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडे शिष्टमंडळ, उपोषण, जिल्हाधिकारी, आमदार धैर्यशील पाटील यांचा पाहणी दौरा, तहसीलदार व प्रांत अधिकाºयांचा दौरा, रास्ता रोको अशी आंदोलने शांततेच्या मार्गाने केली, परंतु दुरुस्तीचे काम अद्याप सुरूझाले नसल्याने शेतकरी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिवकर यांनी सांगितले.
...तर जबाबदारी अधिकाºयांची
१७ एप्रिलपर्यंत फुटलेल्या संरक्षक बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर फुटलेल्या बंधाºयातून वाहणाºया खाडीच्या पाण्यात आम्ही बसणार आहोत. या वेळी आमच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासन म्हणून पेण प्रांताधिकारी, खारभूमी खाते आणि जेएसडब्ल्यू कंपनीची राहील.
जेएसडब्ल्यू कंपनीने बंधाºयाची दुरुस्ती करण्याकरिता, फुटलेल्या संरक्षक बंधाºयापर्यंत जाण्याकरिता आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबींचा अवलंब करून, हरित न्यायालयाचा २७ आॅक्टोबर २०१५चा आदेश विचारात घेवून कोणत्याही परिस्थितीत कांदळवनांचे कोणतेही नुकसान होणार नाही,याची खबरदारी घेवून आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्यात यावी.
- प्रतिमा पुदलवाड, पेण प्रांताधिकारी