५०० कामगारांवर बेकारीची कु-हाड, मर्क्स कंपनीला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 04:54 AM2018-09-28T04:54:19+5:302018-09-28T04:54:31+5:30
द्रोणागिरी नोडमधील मर्क्स कंपनीतून ९९ कामगारांना काढून टाकण्यात आल्याने इतर कामगारांनी आंदोलने केली, तसेच कंपनीतील अधिकाऱ्यांना मारहाणही केली.
उरण (जि.रायगड) - द्रोणागिरी नोडमधील मर्क्स कंपनीतून ९९ कामगारांना काढून टाकण्यात आल्याने इतर कामगारांनी आंदोलने केली, तसेच कंपनीतील अधिकाऱ्यांना मारहाणही केली. वारंवार होत असलेल्या या प्रकारामुळे वैतागलेल्या मर्क्स प्रशासनाने अखेर कंपनीचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुमारे ५०० कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळणार आहे.
एपीएमच्या (मर्क्स) पागोटे द्रोणागिरी येथील प्रकल्पातील ९९ कंत्राटी कामगारांना काढून टाकण्याच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात काही राजकीय मंडळींनी कामगारांना चिथावले. कामगारांच्या गाड्या अडवून दगडफेक केली. कर्मचारी, अधिकाºयांना दमदाटी करीत मारहाणही केली. त्यामुळे एपीएमच्या (मर्क्स) पागोटे युनिटचा गाशा गुंडाळण्याची प्रक्रि या कंपनी व्यवस्थापनाने यापूर्वीच सुरू केली होती. गुरुवारी कंपनीने नोटीस काढून कंपनीचाच लॉक आऊट करण्याचे जाहीर केल्याने कामगार चिंतेत आहेत.