उरण : नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांच्या पुनर्वसनाबाबत विनंती अर्ज समिती अध्यक्ष तथा विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांनी सेक्टर ४८ मधीलच ५.२५ हेक्टर जमीन ग्रामस्थांना देण्याचे निर्देश शुक्रवारी (२८) झालेल्या बैठकीत शासनाला दिल्याची माहिती आ.मनोहर भोईर यांनी दिली.२०१५ पासून अनेक बैठका झाल्या. समितीने विधानसभागृहात समितीचा अहवाल विधानसभा अध्यक्षांच्या मान्यतेने मान्य करण्यात आला. अहवालात नवीन शेवाचो प्रकल्पग्रस्त व लोकप्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे ५.२५ हेक्टर जमीन ग्रामस्थांना देण्याचे मान्य करण्यात आले आहे. परंतु नवीन शेवाच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जी जमीन शासनाने हस्तांतरित केली आहे ती न देता दुसरी जमीन देण्याचे सिडकोकडून वारंवार सांगण्यात येत होते. त्यामुळे जागेचा तिढा सुटला नव्हता.या प्रश्नावर आज बैठक बोलवली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेत विनंती अर्ज समिती अध्यक्ष तथा विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांनी आमदार मनोहर भोईर यांच्या मागणीप्रमाणे सेक्टर ४८ मधीलच जमीन देण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत. शासनाकडून याची लवकरच अंमलबजावणी करण्याचे निर्देशही या Þअधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.तसेच हनुमान कोळीवाड्याच्या पुनर्वसनाबाबत जेएनपीटी, ग्रामस्थ, शासन व स्थानिक आमदार यांनी एकत्रित जमिनीचा १५दिवसांत सर्व्हे करून केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवावा. तसेच याची माहिती विनंती अर्ज समितीला कळविण्यात यावी असे निर्देशही विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांनी दिले आहेत.२०१५ पासूनची मागणीजेएनपीटी विस्थापित नवीन शेवा गावातील रहिवाशांना गावठाण विस्तारासाठी सेक्टर ४८ मधीलच ५.२५ हेक्टर जमीन देण्याची मागणी आमदार मनोहर भोईर यांनी २०१५ मध्ये विधानसभा सभागृहात केली होती. २०१५ पासून अनेक बैठका झाल्या होत्या.
नवीन शेवा ग्रामस्थांना ५.२५ हेक्टर जमीन, विधानसभा उपाध्यक्षांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 3:12 AM