शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

रायगड जिल्ह्यात ५४० गावे, १४९३ वाड्यांत जलदुर्भिक्ष, २०७ गावे-वाड्यांत २३ टँकर्सने पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 2:35 AM

सद्यस्थितीत जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ४८ गावे व १५९ वाड्या अशा एकूण २०७ गावे-वाड्यांना २३ टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे.

- जयंत धुळपअलिबाग : सद्यस्थितीत जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ४८ गावे व १५९ वाड्या अशा एकूण २०७ गावे-वाड्यांना २३ टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात १५८ गावांसाठी १९ टँकर्स सुरू होते. आता त्यात ४ टँकर्सची भर पडली आहे. मागणीनुसार टँकर्सची संख्या वाढविण्यात येणार आहे.उन्हाळी पाणीटंचाई निवारणार्थ आॅक्टोबर २०१८ ते जून २०१९ पर्यंत जिल्ह्यातील ५४० गावे आणि १४९३ वाड्या अशा २०३३ गाव-वाड्यांतील ४९ हजार ८५५ ग्रामस्थांची तहान भागविण्याकरिता ९ कोटी ४० लाखांचा पाणीटंचाई निवारण कार्यक्र म अमलात आणण्यात आला आहे.रायगड जिल्हा परिषदेचे सर्व तालुका गट विकास अधिकारी व विभाग प्रमुख यांच्या बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या संदर्भात सुरू असलेल्या कामांचा आढावा रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी सोमवारी घेतला.जिल्ह्यातील पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपाययोजना राबविण्यास सुरु वात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत गावे -वाड्यांना तातडीने टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तत्काळ झाला पाहिजे तसेच विंधन विहिरींची कामेही त्वरित पूर्ण करण्याचे आदेश हळदे यांनी यावेळी दिले आहेत.गटविकास अधिकारी तसेच सहायक विस्तार अधिकारी यांनी, आपापल्या भागात सातत्याने पाणीटंचाईबाबत आढावा घेतराहावे, तसेच वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करावा व त्यानुसार उपाययोजना करावी. उप विभागीय महसूल अधिकारी व तहसीलदार यांच्याशी समन्वय ठेवावा, असेही हळदे यांनी सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी यांनी देखील बैठकीत मार्गदर्शन केले.३१ नळपाणी योजनांच्या दुरुस्तीस१ कोटी २ लाखांचा निधी प्रस्तावितजिल्ह्यातील १७ गावे आणि १४ वाड्या अशा एकूण ३१ ठिकाणच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीकरिता १ कोटी २ लाख ८२ हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. माणगाव तालुक्यातील दोन दुरुस्ती प्रस्ताव मंजूर झाले असून कार्यादेशाची प्रक्रिया सुरूआहे. महाड तालुक्यातील दोन दुरुस्ती प्रस्ताव मिंजुरीकरिता आले आहेत. तर पोलादपूर व कर्जतमध्ये प्रत्येकी एक प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहेत.रायगड उन्हाळी पाणीटंचाई निवारणनिधी मागणी३ कोटी३५ लाखप्राप्त निधी३ कोटी२ लाख३७ विंधण विहिरींची दुरुस्ती : जिल्ह्यातील ५७ गावे आणि १०६ वाड्या अशा एकूण १६३ ठिकाणच्या विंधण विहिरींची दुरुस्ती करण्याकरिता ४१ लाख ८२ हजारांच्या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यापैकी ४२ गावे व ४९ वाड्यांमध्ये एकूण ९१ ठिकाणच्या विंधण विहिरींच्या दुरुस्तीस मान्यता मिळाली आहे. त्यापैकी २१ गावे व १६ वाड्या अशा एकूण ३७ ठिकाणच्या विंधण विहिरींची दुरुस्ती करण्यात आली आहे.९० गावे व १० वाड्यांत २९ नवीन विंधण विहिरीआॅक्टोबर २०१८ पासून जिल्ह्यात विंधण विहिरींची कामे सुरू आहे. जिल्ह्यातील १३० गावे व ४४२ वाड्या अशा एकूण ५७२ ठिकाणी विंधण विहिरी घेण्याकरिता ३ कोटी ३१ लाख ७६ हजार रुपयांचा आराखडा प्रस्तावित आहे. ५२ गावे आणि १८७ वाड्या अशा एकूण २२७ नवीन विंधण विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी ९० गावे व १० वाड्यांमध्ये ३९ ठिकाणी विंधण विहिरी पूर्ण करण्यात आल्या, त्यापैकी २९ विंधण विहिरी यशस्वी झाल्या आहेत. सर्वाधिक विंधण विहिरी महाड, पोलादपूर, पेण या तीन तालुक्यात आहेत. 

टॅग्स :Raigadरायगडwater scarcityपाणी टंचाई