मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७ टक्के मतदान, उरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 05:02 PM2024-05-14T17:02:28+5:302024-05-14T17:02:52+5:30

मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत एकूण २५ लाख ८५ हजार ०१८ मतदारांपैकी १४ लाख १८ हजार ४३९ मतदानाचा हक्क बजावला आहे.

54.87 percent polling in Maval Lok Sabha constituency, highest polling in Uran assembly constituency | मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७ टक्के मतदान, उरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान 

मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७ टक्के मतदान, उरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान 

उरण (मधुकर ठाकूर ): मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात सरासरी ५४.८७ टक्के मतदान झाले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत एकूण २५ लाख ८५ हजार ०१८ मतदारांपैकी १४ लाख १८ हजार ४३९ मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष -सात लाख ७७ हजार ७४२, स्त्री-सहा लाख ४० हजार ६५१ आणि इतर ४६ आदी मतदारांचा समावेश आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान:-

उरण - एकूण मतदार संख्या - ३ लाख १९ हजार ३११ ,झालेले मतदान २ लाख १४ हजार १६९ (६७.०७) टक्के, कर्जत -एकूण मतदार संख्या - ३ लाख ०९ हजार २०८,झालेले मतदान १ लाख ८९ हजार ८५३ (६१.४०) टक्के

मावळ-एकूण मतदार संख्या - ३ लाख ७३ हजार  ४०८,झालेले मतदान २ लाख ०६ हजार ९४९  (५५.४२ टक्के), चिंचवड -एकूण मतदार संख्या - ६ लाख १८ हजार २४५, झालेले मतदान ३ लाख २२ हजार ७००  (५२.२० टक्के), पिंपरी- एकूण मतदार संख्या - ३ लाख ७३ हजार ४४८,झालेले मतदान १ लाख ८८ हजार ७९५ (५०.५५ टक्के) , पनवेल -एकूण मतदार संख्या - ५ लाख ९१ हजार ३९८, झालेले मतदान २ लाख ९५ हजार ९७३ (५०.०५ टक्के) 

सर्वात मोठ्या चिंचवड व पनवेल विधानसभा मतदारसंघात कमी मतदान झाले आहे.तर उरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे.

Web Title: 54.87 percent polling in Maval Lok Sabha constituency, highest polling in Uran assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.