शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

जिल्ह्यात घरफोडीचे ५७२ गुन्हे

By admin | Published: September 24, 2015 12:27 AM

रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत गेल्या आठ महिन्यांपासून दरोडे, जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि चोऱ्यांच्या प्रमाणांत प्रचंड वाढ झाली आहे.

जयंत धुळप, अलिबागरायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत गेल्या आठ महिन्यांपासून दरोडे, जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि चोऱ्यांच्या प्रमाणांत प्रचंड वाढ झाली आहे. जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात दरोड्याचे चार, जबरी चोरीचे ४१, घरफोडीचे १५३ तर चोरीचे ३७४ असे ५७२ गुन्हे दाखल झाले असून या सर्व गुन्ह्यांमध्ये एकूण ३०० गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.जिल्ह्यातील या ५७२ गुन्ह्यांत गुन्हेगारांनी तब्बल १० कोटी ६५ लाख २१ हजार ८८३ रुपयांचा ऐवज लंपास केला होता, त्यापैकी ६ कोटी २४ लाख २३ हजार ५३४ रुपयांचा ऐवज परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. रायगड पोलिसांचे हे गुन्हे उकल प्रमाण ५८.६० टक्के आहे. चार दरोड्यांच्या गुन्ह्यांपैकी दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले. दोघा दरोडेखोरांना अटक करण्यात आली. या दरोड्यांत लंपास केलेल्या २ लाख ७ हजार २८० रुपयांच्या ऐवजापैकी केवळ १ हजार ४०० रुपयांचा ऐवज पोलिसांना परत मिळवता आला असून हे गुन्हे उकल प्रमाण ०.६० टक्के आहे.जबरी चोरीचे जिल्ह्यात ४१ गुन्हे दाखल झाले, त्या प्रकरणी ३५ जणांना अटक करण्यात आली. या ४१ जबरी चोऱ्यांमध्ये १ कोटी १७ लाख ३८ हजार ८२० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. २४ जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करुन उकल करण्यात पोलिसांना यश आले असून, यात ८ लाख ५२ हजार ९२० रुपयांचा ऐवज परत मिळवला आहे. हे गुन्हे उकल प्रमाण ७.२६ टक्के आहे.चोरीचे जिल्ह्यात ३७४ गुन्हे दाखल झाले, त्यात २१५ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. १२७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. या सर्व चोऱ्यांमध्ये चोरीस गेलेल्या ८ कोटी ३८ लाख २ हजार ५९१ रुपयांच्या ऐवजापैकी ६ कोटी ५ लाख ३२ हजार ४५५ रुपयांचा ऐवज पोलिसांनी परत मिळवला असून हे गुन्हे उकल प्रमाण ७२.२३ टक्के आहे.घरफोडीचे जिल्ह्यात १५३ गुन्हे दाखल झाले, त्यातील केवळ २२ गुन्ह्यांची उकल रायगड पोलिसांना आतापर्यंत करता आली आहे. या गुन्ह्यांमध्ये ४८ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. घरफोड्या करुन चोरट्यांनी लंपास केलेल्या एकूण १ कोटी ७ लाख ७३ हजार १९२ रुपयांच्या ऐवजापैकी १० लाख ३६ हजार ७५९ रुपयांचा ऐवज परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून याचे गुन्हे उकल प्रमाण ९.६२ टक्के आहे.