रायगडमध्ये दीड वाजेपर्यंत ५९.५७ टक्के मतदान, एका ठिकाणी ईव्हींएम मशीन बंद
By राजेश भोस्तेकर | Published: October 16, 2022 03:06 PM2022-10-16T15:06:23+5:302022-10-16T15:06:57+5:30
जिह्यातील वीस पैकी सोळा सार्वत्रिक ग्रामपंचायतीसाठी आज रविवारी १६ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील वीस पैकी १६ सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज १६ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ६१ मतदान केंद्रावर मतदार आपला निवडणुकीचा हक्क बजावत आहे. सकाळी दीड वाजेपर्यंत १८ हजार ६४४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दीड वाजेपर्यंत पर्यंत ५९.५७ टक्के मतदान पार पडले आहे. मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मतदानासाठी पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त मतदान केंद्रावर ठेवण्यात आलेला आहे.
जिह्यातील वीस पैकी सोळा सार्वत्रिक ग्रामपंचायतीसाठी आज रविवारी १६ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. १६ सरपंच पदासाठी ३६ उमेदवार तर १८४ सदस्य पदासाठी २४७ उमेदवार रिंगणात आपले भवितव्य अजमावित आहेत. ६१ मतदान केंद्रावर मतदान ३१ हजार २९७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
रायगड जिल्ह्यात अलिबाग ३, पेण १, पनवेल १, कर्जत २, खालापूर ४, माणगाव ३, महाड, १, पोलादपूर ४, श्रीवर्धन १ या तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. वीस पैकी पेण, कर्जत आणि पोलादपूर येथील प्रत्येकी एक अशा तीन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर अलिबाग मधील एका ग्रामपंचायतीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. १६ ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू आहे.
वेश्र्वी ग्रामपंचायत निवडणुकीत ईव्हींएम मशीन बंद
वेश्र्वी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. वेश्र्वी येथील मराठी शाळेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे. याठिकाणी प्रभाग क्रमांक तीन साठी मतदान सुरू असताना दीडशे मतदान झाल्यानंतर ई व्ही एम मशीन बंद पडल्याने मतदारांना तासभर ताटकळत राहावे लागले. मशीन बदलल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे मतदारांना एक तास वाढवून दिला जाणार आहे. असे निवडणूक अधिकारी यांनी म्हटले आहे.