लोकमत न्युज नेटवर्क पनवेल:खारघर सेक्टर 10 मधील कोपरा गावाच्या परिसरात पथदिव्यांच्या विद्युत प्रवाह खांबामध्ये परावर्तित झाल्याने याठिकाणी उभ्या असलेल्या सहा बकऱ्या या प्रवाहाच्या संपर्कांत आल्याने सहाही बकऱ्या गतप्राण झाल्याची घटना दि.24 रोजी घडली. दरम्यान शनिवारी जोरात पाऊस सुरु असताना हr घटना घडली.
बकरी ईद सण तोंडावर आला असताना त्याकरिता या बकऱ्या घेऊन जात असताना ही घटना घडली. दरम्यान बकऱ्यांचा मालक आजुन समोर आलेला नाही. याबाबत खारघर कॉलनी फोरम चे समन्वयक ऍडव्होकेट बालेश भोजने यांनी याबाबत आक्षेप घेत.पथदिवे बसविणाऱ्या कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे हि घटना घडल्याचे सांगत दोषींवर कारवाई करण्याची मागणी खारघर पोलिसांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याबाबत लेखी पत्र देखील भोजने यांनी पोलिसांना सादर केले आहे.
पालिकेचे विद्युत विभागाचे प्रमुख प्रीतम पाटील यांनी याबाबत सांगितले की या दुर्दैवी घटनेची चौकशीसाठी विद्युत इन्स्पेक्टर यांना कळविले आहे.याबाबत पूर्ण चौकशी करूनच घटनेची माहिती समोर येईल असे त्यांनी संगीतले. दरम्यान ज्या ठिकाणी हि दुर्घटना घडली ते वर्दळीचे ठिकाण आहे. जोरदार पावसामुळे याठिकाणची वर्दळ थांबल्याने या घटनेत माणसाचा बळी गेला नाही.