मधुकर ठाकूर, उरण : जेएनपीएने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात ६४ लाख ३० हजार ४४३ (६.४३ मिलियन टीईयुस) इतक्या कंटेनर मालाची हाताळणी केली आहे.कंटेनर मालाची हाताळणीमध्ये मागील आर्थिक वर्षांपेक्षा ६.२७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात जेएनपीएने ८३.८६ दशलक्ष टन बल्क, कंटेनर मालाची हाताळणी केली होती.२०२३-२०२४ या आर्थिक वर्षात जेएनपीएने एकूण ८५.८२ दशलक्ष टन बल्क कंटेनर मालाची हाताळणी केली आहे. यामध्ये २.३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जेएनपीए बंदर एक्झिम व्यापारासाठी प्रमुख केंद्र बनले आहे.जेएनपीए बंदराच्या या यशात सेंट्रलाईज पार्किंग प्लाझा, सिंगल विंडो क्लीयरन्स आणि इतर विविध उपक्रमांसह उच्च दर्जाच्या सेवा देणाऱ्या अनेकांचा सहभाग आहे.व्यवसायावर विश्वास दाखविणारे सर्व भागीदार आणि भागधारक यांनी दिलेल्या सहभागामुळेच जेएनपीएला हे यश संपादन करता आले आहे.देशाच्या आर्थिक प्रगतीत योगदान देण्याच्या आपल्या ध्येयासाठी कायम प्रयत्नशील असणाऱ्या सर्व भागीदार आणि भागधारकांकडून मिळालेल्या समर्थनाबद्दल जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी जेएनपीए बंदरातील सर्व टर्मिनल ऑपरेटर आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते .