बस झाडाला अडकली, म्हणून वाचले ६४ विद्यार्थी; डोंबिवलीतील सहलीच्या बसला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 07:02 AM2023-01-07T07:02:32+5:302023-01-07T07:03:16+5:30
बसमधून ६४ विद्यार्थी आणि ६ शिक्षक प्रवास करीत होते. शुक्रवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी हा अपघात झाला.
खोपोली : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला. सुदैवाने ही बस एका झाडाला अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने सर्वजण सुखरूप आहेत. बसमधून ६४ विद्यार्थी आणि ६ शिक्षक प्रवास करीत होते. शुक्रवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी हा अपघात झाला.
डोंबिवलीतील कोपर येथील च. रु. बामा म्हात्रे विद्यामंदिर शाळेची इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्याची सहल एकवीरा येथे बसने गेली होती. एकवीरा येथून दर्शन आटोपून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोलीतील गगनगिरी आश्रम येथे जात असताना शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये त्यांच्या बसचा ब्रेक निकामी झाला. बस झाडाला धडकून अपघात झाला. अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. बस बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. बसमधील विद्यार्थी, शिक्षक यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून गगनगिरी आश्रमामध्ये सुखरूप पोहोचवण्यात आले.
आश्रमात आसरा
अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. बस बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. बसमधील विद्यार्थी, शिक्षक यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून गगनगिरी आश्रमामध्ये सुखरूप पोहोचवण्यात आले.