नागोठणे : १९१ पेण मतदारसंघातील नागोठणे शहरात निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडली. शहरातील दहा मतदान केंद्रात ८,६९४ मतदार असून, त्यापैकी सोमवारी ५,६१४ मतदारांनी आपला हक्क बजावला. शहरातील मतदानाची टक्केवारी ६४.५९ टक्के इतकी झाली. शहरात सर्वात जास्त मतदान कचेरी शाळेतील २७६ या केंद्रात ७३.९२ टक्के, तर सर्वात कमी मतदान कन्याशाळेतील २८१ या केंद्रात ५७.३६ टक्के इतके झाले.
मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पो. नि. दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व मतदान केंद्र व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानानंतर पेण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र पाटील, महाआघाडीचे उमेदवार धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या नंदा म्हात्रे आणि इतर ११ उमेदवारांचे भवितव्य २४ आॅक्टोबरपर्यंत मतपेटीत बंद झाले. नागोठणे शहरातील सर्वच मतदान केंद्रात सकाळपासून मतदार तुरळक प्रमाणात मतदान करण्यासाठी येत असल्याचे दिसून आले.
दहा मतदान केंद्रांतील मतदानाची आकडेवारी-
केंद्र क्रमांक- मतदार- मतदान
२७२- (उर्दू शाळा)- १२५४- ८६५२७३- (उर्दू शाळा)- ८९३- ६२६२७४- (उर्दू हायस्कूल)- १०५०- ६९७२७५- (उर्दू हायस्कूल)- ५४९- ४०५२७६- (कचेरी शाळा)- ६०६- ४४८२७७- (कचेरी शाळा)- ९४५- ५८९२७८- (कचेरी शाळा-) ७०१- ३७०२७९- (कन्या शाळा)- १०३५- ६६१२८०- (कन्या शाळा)- ४९३- २८३२८१- (कन्या शाळा)- ११६८- ६७०