जयंत धुळप।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड लोकसभा निवडणूक अनेक कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. निवडणुकीच्या या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात मोठी कसोटी आहे ती रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक यंत्रणेची. रायगडमधील निवडणूक यंत्रणा सांभाळणाºया एकूण यंत्रणेत तब्बल ६५ टक्के महिला अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. संपूर्ण यंत्रणेत महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण विक्रमी असून त्या आपल्या जबाबदाºया प्रभावीपणे पार पाडत आहेत.
एकीकडून विविध राजकीय पक्ष, दुसरीकडे प्रसिद्धी माध्यमे, तर सी-व्हीजीलसारख्या अॅपच्या माध्यमातून जनसामान्यांना थेट भारत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची देण्यात आलेली संधी आणि त्या तक्रारीवर पुढील १०० मिनिटांत करायची कारवाई, कडक निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी अशा एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या, एकाच वेळी अनेक निर्णय बिनचूक घेण्याच्या सत्त्वपरीक्षेच्या कालखंडात या सर्व महिला अधिकारी सातत्याने यशस्वी होत आहेत हे वैशिष्ट्यपूर्ण असे आहे.
मनुष्यबळ व्यवस्थापन, खर्च सनियंत्रण, कायदा व सुव्यवस्था, निवडणूक निरीक्षक अशा निवडणूक यंत्रणेत अत्यंत महत्त्वाच्या चार जबाबदाºया रायगडच्या निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे या एकाच वेळी अत्यंत प्रभावीपणे सांभाळत आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचे अखेरच्या क्षणापर्यंत अद्ययावतीकरण, निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ततेकरिता आवश्यक निविदा प्रक्रिया, याबरोबरच मतदान यंत्रे आदी अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदाºया रायगडच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने या सांभाळत आहेत.
अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार या अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक अधिकारी या आपल्या प्रमुख जबाबदारीबरोबरच लोकसभा निवडणुकीतील नामनिर्देशनपत्र जबाबदारी अत्यंत काळजीपूर्वक सांभाळत आहेत. मतदान व मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी यांचे संबंधित प्रशिक्षण घेऊन त्याच्या माध्यमातून मतदान व मतमोजणी प्रक्रिया बिनचूक करवून घेण्याची जबाबदारी त्या निभावत आहेत. निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी ही २४ तासांची जबाबदारी त्या अलिबागमध्ये निभावत आहेत. पेण प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड या पेण विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक अधिकारी आहेत. मतदान व मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी यांचे संबंधित प्रशिक्षण घेऊन त्याच्या माध्यमातून मतदान व मतमोजणी प्रक्रिया बिनचूक करवून घेण्याची जबाबदारी त्या निभावत आहेत. आपल्या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रे, तेथील व्यवस्था, आदी बाबतीत त्या अत्यंत काळजीपूर्वक कार्यरत आहेत. निवडणूक आचारसंहितेचा कोठेही भंग होणार नाही याकरिता त्या २४ तास आपल्या पेण विधानसभा मतदारसंघावर नजर ठेवून आहेत.
माणगाव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर या जिल्हा निवडणूक आराखडा समितीच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. निवडणूक प्रक्रियेशी निगडित सर्व मुद्द्यांचा समावेश या आराखड्यात असून त्याची अंमलबजावणी व त्याकरिता आवश्यक निर्णय घेण्याचीजबाबदारी त्यांच्याकडे आहे. संपर्क संवाद ही जबाबदारी देखील त्यांच्याकडे आहे.
कर्जत प्रांताधिकारी ही जबाबदारी सांभाळत असतानाच, वैशाली परदेशी या कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक यंत्रणेत कार्यरत आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदार संघात येतो. परिणामी त्या मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकाºयांशी समन्वय राखून रायगडमध्ये कार्यरत आहेत. उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) अश्विनी पाटील यांच्याकडे मतपत्रिकांची जबाबदारी आहे तर अधीक्षक भूमी अभिलेख चारुशीला चव्हाण आणि उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) दीपा भोसले या देखील निवडणूक यंत्रणेत कार्यरत आहेत.
तहसील स्तरावरील निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, मतदान दिनीचे नियोजन आदी महत्त्वपूर्ण जबाबदाºया तहसीलदारांकडे असतात आणि या जबाबदाºया पेण तहसीलदार अरुणा जाधव, रोहा तहसीलदार कविता जाधव, माणगाव तहसीलदार प्रियंका आयरे, उरण तहसीलदार कल्पना गोडे, पोलादपूर तहसीलदार प्राजक्ता घोरपडे या महिला तहसीलदार नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत आहेत.तहसीलदारांना साहाय्य करण्याकरिता या निवडणूक यंत्रणेत अलिबाग निवासी नायब तहसीलदार सुरेखा घुगे, मुरुड निवासी नायब तहसीलदार वनिता म्हात्रे, रोहा निवासी नायब तहसीलदार छाया साठे, खालापूर निवासी नायब तहसीलदार मीना सावंत आणि उरण निवासी नायब तहसीलदार आशा म्हात्रे या महिला निवासी नायब तहसीलदार नेटाने कार्यरत आहेत.कायदा व सुव्यवस्था राखण्यात महिला पोलीस अधिकारी सक्रियकायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता उप विभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविसकर, मांडवा सहायक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे, कर्जत पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, पेण पोलीस उपनिरीक्षक नाजुका पाटील, निवडणूक कक्ष पोलीस उपनिरीक्षक अन्नपूर्णा म्हस्के या महिला पोलीस अधिकारी धाडसाने कार्यरत आहेत. रायगड जि.प.उप मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेंतर्गत मुरुड गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत, उरण गटविकास अधिकारी नीलम गाडे या कार्यरत आहेत तर पेण न.पा.मुख्याधिकारी अर्चना दिवे या निवडणूक जबाबदाºया निभावत आहेत.निवडणूक यंत्रणा वाहतुकीसाठी अनघा बारटक्के यांचे नियोजननिवडणूक प्रक्रियेत मतदान यंत्रे आणि निवडणूक कर्मचारी यांची सुरक्षित ने-आण करण्याकरिता केवळ एसटीच्या बसेसवरच निवडणूक आयोगाचा भरवसा असतो आणि हा भरवसा खरा ठरवण्याकरिता रायगड एसटी (राज्य परिवहन)विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के या अत्यंत प्रभावीपणे कार्यरत असून त्याना रोहा आगार व्यवस्थापक सोनाली कांबळे आणि श्रीवर्धन आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर या महिला अधिकारी सहकार्य करीत आहेत.बेकायदा मद्यावर नजर ठेवून भट्ट्या उद्ध्वस्त करताहेत सीमा झावरेनिवडणुकीच्या निमित्ताने बेकायदा मद्य विक्री, मद्य वाहतूक, मद्य वाटप यावर अत्यंत करडी नजर ठेवून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या गावठी दारूनिर्मितीच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात यश मिळविले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने वाहनांचा अनेकदा गैरवापर केला जातो, तो रोखण्याकरिता पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील आणि पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार या दोन्ही महिला अधिकारी सर्व महामार्गावर अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहेत.