महाड : जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांसाठी झालेल्या मतदानात महाड तालुक्यात ६५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गावाकडच्या प्रत्येक निवडणुकीसाठी नेहमी हजर राहणाऱ्या मुंबई, पुणे, ठाणे या शहरात वास्तव्यास असलेल्या मूळच्या महाडकरांनी मात्र शहरातच राहणे पसंत केले. मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या या मतदानासाठी दुपारनंतर मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याचे दिसून आले. एकूण २०० मतदान केंद्रांवर झालेले मतदान शांततेत पार पडले. कुठलाही गैरप्रकार वा वाद न झाल्याने शासकीय यंत्रणेने सुस्कारा सोडत या निवडणुकीतील शिवसेना आ. भरत गोगावले व काँग्रेसचे माजी आ. माणिक जगताप यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसून आले. आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.या निवडणुकीत महाड तालुक्यात शिवसेना, काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा चौरंगी लढती होत असल्या तरी खरी लढत शिवसेना व काँग्रेसमध्येच होणार, हे स्पष्ट आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुषमा सातपुते आणि डीवायएसपी प्रांजली सोनावणे पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे काही मतदान केंद्रावर किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडल्याचे दिसून आले. (वार्ताहर)
महाड तालुक्यात ६५ टक्के मतदान
By admin | Published: February 22, 2017 6:45 AM