सीआरझेडप्रकरणी ६६ जणांवर दोषारोपपत्र, महसूलसह पोलिसांकडून कारवाईस टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 05:15 AM2018-06-08T05:15:24+5:302018-06-08T05:15:24+5:30
सीआरझेड कायद्याचा भंग करून बेकायदा बांधकाम करणाऱ्या तब्बल ६६ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी अलिबागचे प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना दिली आहे.
- आविष्कार देसाई
अलिबाग : सीआरझेड कायद्याचा भंग करून बेकायदा बांधकाम करणाऱ्या तब्बल ६६ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी अलिबागचे प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना दिली आहे. दोषारोपपत्र दाखल केलेल्यांमध्ये ‘बिगशॉट’ व्यक्तींचा समावेश असल्याने पोलीस या प्रकरणी आता नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अलिबाग आणि मुरुड तालुक्यामध्ये समुद्रकिनारी टोलेजंग बंगले, इमारती बांधण्यात आल्या आहेत. सीआरझेड कायद्याचा भंग करूनच ही बेकायदा बांधकामे उभारण्यात आली आहेत. याविरोधात प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, महसूल प्रशासनासह पोलिसांकडून ठोस कारवाई करण्यात आली नव्हती.
बेकायदा बांधकामाबाबत न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती, तसेच याबाबत लक्षवेधीही मांडण्यात आली होती.
त्यानंतर अलिबाग, मांडवा आणि रेवदंडा पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, या गुन्ह्यांतील दोषारोपपत्र दाखल करण्याचे अधिकार पोलिसांकडे नसल्याने प्रकरण रेंगाळले होते. याबाबतचे अधिकार प्रांताधिकारी यांना असल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यात आली नाही, असे पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय निघोट यांनी सांगितले.
प्रांताधिकाºयांनी दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी देताना ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांना प्रत्येकी परवानगी न देतात सरसकट दोषारोपपत्र दाखल करण्याचे सांगितले होते. मात्र, ते आम्ही फेटाळून पुन्हा प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवल्याचे निघोट यांनी स्पष्ट केले.
प्रांताधिकारी कार्यालयाकडून प्रत्येकाच्याबाबतीत दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी आल्यावरच ते न्यायालयात दाखल केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी जूनच्या पहिल्याच आठवड्यात कारवाईच्या परवानगीसंदर्भात अलिबाग, मांडवा आणि रेवदंडा पोलिसांना दिल्याचे पत्र काढले आहे. त्यामुळे आता न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यातील अडथळा दूर झाला आहे.
पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले
राकेशकुमार वधावन यांनी कांदळवनांची कत्तल केल्याची तसेच बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार अलिबाग येथील संजय तळेकर यांनी केली आहे.
ही तक्रार १९ मे २०१८ रोजी करण्यात आली आहे. त्यानुसार कारवाई करण्यासाठी तक्रार अर्ज मांडवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार मांडवा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक बुरांडे यांनी तपास सुरू केला.
कार्यवाही करण्याचे अधिकार प्रांताधिकारी यांना असल्याने बुरांडे यांनी कारवाई केली नव्हती. आता मात्र प्रांताधिकारी यांनी पोलीस ठाण्यांना या प्रकरणातील गुन्ह्याबाबत दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी दिल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत राकेशकुमार वधावन यांच्यासह त्यांचे व्यवस्थापक अनंत पडीयार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
मांडवा पोलीस ठाण्यामध्ये
मेहुलाल चुनीलाल चोक्सी, आवास-अलिबाग; लीलावती विनोद मोमया, रहाटले-अलिबाग; अमी केतन गांधी, आवास-अलिबाग; आशिष गिरीधरलाल वेद, आवास-अलिबाग; आदी बी. दुभाष, आवास- अलिबाग; राकेशकुमार कुलदीपसिंग वधावन, आवास-अलिबाग; फिरोजा फिरोज नेटरवाल, आवास-अलिबाग; अनिता शंकरराव देशमुख, आवास-अलिबाग; रेमू झवेर ऊर्फ अब्दुल रहेमान झवेरी, आवास, अलिबाग यांच्यासह अन्य जणांचा सहभाग आहे.
मुरुड पोलीस ठाण्यात
रंजुल गोस्वामी, नांदगाव-मुरुड, सलिम गोवानी-काशिद-मुरुड, आशिष सुभाष दांडेकर, नांदगाव-मुरुड, झिनत अमानउल्ला अमान-नांदगाव-मुरुड, आस्पी चिनॉय, नांदगाव-मुरुड, वैकंटराम शांतीकुमार, आडी-मुरुड, झिनीया खजोटीया, नांदगाव-मुरुड, रिझवान गुलाम हुसेन मर्चंट-नांदगाव, फ्रॅमरोज फिरोझ मेहता, मुंबई यांच्यासह अन्य काही जणांचा समावेश आहे.
रेवदंडा पोलिसांकडे
विरा फारुक उडवाडीया-रेवदंडा-अलिबाग, मोनिका चुडासामा वजीर अली, कोर्लई-अलिबाग, मंजुळा अशोक राव-रेवदंडा-अलिबाग, सत्यपाल जयकुमार जैन,बारशिव- मुरुड, राजेश पुंडलिक गायकवाड, रेवदंडा-अलिबाग, कृष्णकांत ब्रिजमोहन शर्मा-बारशिव-मुरुड, मधुकर रामचंद्र कुलकर्णी- बारशिव-मुरुड, संजय महेश बकरुडीया, बारशिव-मुरुड, सुनील शेठमल गुप्ता-बारशिव-मुरुड, अनोश केफी श्रॉफ, बारशिव-मुरुड, सेजल विशाल गोयंका, बोर्ली-मुरुड, खुशनुमा शाबीर कपाडीया, बारशिव-मुरुड यांच्यासह अन्य जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये
अंजली विवेक तलवार, विवेक प्राणनाथ तलवार, थळ आगार-अलिबाग, गोकुळ दामोदर धिया, नागाव, अलिबाग, मुकुं द धरमदास दलाल, वरसोली-अलिबाग, बी.डी.नरीमन, मुंबई, जतिन मनुभाई शेठ, मुंबई, राकेश (रिकी) हरीश लांबा, मुंबई, नाझनित अब्दुल झवेरी, आक्षी-अलिबाग, अजय गोपीलिखन पिरामल, मुंबई, बुन्नू गुरुचरण दास, दिल्ली, रवि कन्हैयालाल शेठ, भरत कन्हैयालाल शेठ, नागाव-अलिबाग यांच्यासह अन्य काही जणांचा समावेश आहे.