ट्रेलर-जीप अपघातात ७ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 04:26 AM2018-02-03T04:26:50+5:302018-02-03T04:27:05+5:30
भरधाव वेगात जीपच्या चालकाला रस्त्याचा दुभाजक न दिसल्याने, जीप मातीच्या ढिगाºयावर चढून समोरून येणाºया ट्रेलरवर आदळल्याने, ट्रेलरचालक, तसेच जीपमधील सहा जण गंभीर जखमी झाले.
नागोठणे - भरधाव वेगात जीपच्या चालकाला रस्त्याचा दुभाजक न दिसल्याने, जीप मातीच्या ढिगाºयावर चढून समोरून येणाºया ट्रेलरवर आदळल्याने, ट्रेलरचालक, तसेच जीपमधील सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी पहाटे ६.३० च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर पळस गावच्या हद्दीत घडला.
एमएच ४६ एएफ ३३१९ क्र मांकाचा ट्रेलर पोकलेन यंत्र भरून माणगावहून पनवेलकडे, तर एमएच ०१ सीपी ८०९५ क्र मांकाची जीप मुंबईहून गोव्याकडे चालली होती. ट्रेलरचालक तात्यासाहेब बाराते (रा. कळंबोली) यांना नागोठणे प्राथमिक आरोग्यकेंद्रात, तर जीपमधील नीलेश बोरावत, सुनील जैन, काजल जैन, पीयूष जैन, आशा जैन आणि सारिका (३) (सर्व रा. परळ, मुंबई ) या ६ जखमींना पुढील उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात केली आहे. हेड कॉन्स्टेबल श्रीकांत म्हात्रे पुढील तपास करीत आहेत.