शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चार गावांत ७०० एकर शेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 4:23 AM

अलिबाग तालुक्यातील चरी गावातील आणि ७०० एकर भातशेतीतील पावसाचे पाणी वहिवाटीच्या मार्गावरून वाहून जाते. या मार्गावर राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स (आरसीएफ) थळ येथील खत कारखान्याकरिता रेल्वेमार्ग टाकण्यात आला असून, त्यासाठी मोठा भराव करण्यात आला आहे.

- जयंत धुळपअलिबाग - तालुक्यातील चरी गावातील आणि ७०० एकर भातशेतीतील पावसाचे पाणी वहिवाटीच्या मार्गावरून वाहून जाते. या मार्गावर राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स (आरसीएफ) थळ येथील खत कारखान्याकरिता रेल्वेमार्ग टाकण्यात आला असून, त्यासाठी मोठा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होऊ शकत नाही. गेल्या २५ वर्षांत याबाबत कोणत्याही उपाययोजना न केल्याने ७०० एकर भातशेती व चरी, गोपचरी, कांडविरा व खोपणेखार या चार गावांतील मानवी वस्तीला धोका निर्माण झाल्याची शक्यता आहे. याबाबत लेखी निवेदन चरी गावातील शेतकरी रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरी, गोपचरी, कांडविरा व खोपणेखार गावांतील २४ बाधित शेतकऱ्यांनी अलिबाग तहसीलदार प्रकाश संकपाळ यांना सोमवारी दिले.सरकारने या गंभीर समस्येबाबत सत्वर उपाययोजना करावी, या अपेक्षेने याच निवेदनाच्या प्रती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी सर्जेराव सोनावणे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनाही देण्यात आल्याचे चरी गावातील शेतकरी रवींद्र पाटील यांनी सांगितले.चरी खारभूमी योजनेत ७०० एकर भातशेती आहे, त्यावरच शेतकºयांची उपजीविका चालते. याच भातशेतीला लागून चरी, गोपचरी, कांडविरा व खोपणेखार ही गावे व त्यांची शेती आहे. या गावांचे व भातशेतीतील पावसाचे पडणारे पाणी नैसर्गिकरीत्या निचरा होण्याचा मार्ग म्हणजे ‘टाशी’(नाला) आहे. गावकरी दरवर्षी सामूहिक श्रमदान करून त्यातील साचलेला गाळ काढायचे. परिणामी, पावसाळ््यात पाण्याचा निचरा सुयोग्य प्रकारे होऊन भातशेती आणि गावांना कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होत नसे, असा पूर्वइतिहास या निवेदनात लक्षात आणून देण्यात आला आहे.१९८०च्या सुमारास आरसीएफ थळ रेल्वेलाइनकरिता महसुली गाव चरीमधील सलग क्षेत्राचे संपादन करताना नेमके पाणी जाण्याच्या नाल्यावर मातीचा भराव केला गेला. त्यानंतर या रेल्वेलाइनच्या दोन्ही बाजूस पाणी जाण्याकरिता पर्यायी नाला आरसीएफने खणून दिला. मात्र, त्या नाल्यातील गाळ दरवर्षी काढला जात नसल्याने ७०० एकर भातशेतीचे पाणी नैसर्गिकरीत्या निचरा होऊन वाहून जात नसल्याने भातपीक व भाजीपाला कुजतो आणि शेतकºयांची लागवड व त्यावर वर्षभर केलेली मशागत फुकट जाऊन, शेतकºयांच्या हातात काही उत्पन्न येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.रेल्वेलाइनलगतच्या नालेसफाईची मागणीस्थानिक पातळीवर अनेकदा ही बाब लक्षात आणून देऊनही गेल्या २५ वर्षांत या समस्येकडे कृषी खाते वा खारभूमी विकास खाते यांनी लक्ष घातले नसल्याने समस्या गंभीर झाली आहे. नैसर्गिकरीत्या पाणी वाहून जाण्याच्या पर्यायी नाल्यातील गाळ काढण्याची जबाबदारी आरसीएफ थळची असून, पावसाळ््यापूर्वी लक्ष घालून रेल्वेलाइनलगतच्या नाल्यातील गाळ उपसण्याची कार्यवाही त्यांच्याकडून करून घेऊन शेती पिकासहित वाचवावी, अशी विनंती या निवेदनात अखेरीस करण्यात आली आहे.

टॅग्स :RaigadरायगडagricultureशेतीFarmerशेतकरी