७/१२वरील सहीची तक्रार निकाली तलाठ्यांची आॅनलाइन सातबारावर डिजिटल सही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:18 AM2017-08-11T06:18:32+5:302017-08-11T06:18:32+5:30

रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील एक हजार ९७१ गावांपैकी एक हजार ९४४ गावांमध्ये ई-चावडी वाचनाचा कार्यक्रम पार पडला. त्याचप्रमाणे १२ तालुक्यांमध्ये आता आॅनलाइन सातबारावर तलाठ्यांची डिजिटल सही मिळणार आहे.

7/12 digitally corrected online registration | ७/१२वरील सहीची तक्रार निकाली तलाठ्यांची आॅनलाइन सातबारावर डिजिटल सही

७/१२वरील सहीची तक्रार निकाली तलाठ्यांची आॅनलाइन सातबारावर डिजिटल सही

Next

- आविष्कार देसाई 
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील एक हजार ९७१ गावांपैकी एक हजार ९४४ गावांमध्ये ई-चावडी वाचनाचा कार्यक्रम पार पडला. त्याचप्रमाणे १२ तालुक्यांमध्ये आता आॅनलाइन सातबारावर तलाठ्यांची डिजिटल सही मिळणार आहे. त्यामुळे आता सातबारावर सही नसणे ही तक्र ार निकाली आहे.
डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्र म हाती घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील सातबारा हा आॅनलाइन मिळावा यासाठी सरकारने ही योजना आखली आहे. त्यामुळे घरबसल्या आपल्याला सातबारा मिळणार आहे. सातबारा आॅनलाइन असल्याने त्यामध्ये कोणतीच खाडाखोड अथवा बदल करता येणार नसल्याने खोट्या जमिनींच्या व्यवहारांना चाप लागला आहे. मूळ मालकाच्या संमतीशिवाय असे बदल करता येणार नसल्याने बोगस व्यवहारांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने सेझसारख्या प्रकल्पांचे वारे वाहू लागल्याने मोठ्या संख्येने खोटे व्यवहार झाले होते. या सर्व प्रकारांना रोखण्यासाठी आॅनलाइन सातबारा हा चांगला पर्याय आहे. यासाठीच सरकारने १ मे २०१७ पासून जिल्ह्यातील सर्व गावातील जमिनींचे सातबारा आॅनलाइन करण्यावर मोठ्या संख्येने भर दिला. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील तब्बल एक हजार ९७१ गावांपैकी एक हजार ९४४ गावांमध्ये ई-चावडी वाचनाचा कार्यक्र म पार पडला आहे. ९८.६३ टक्के काम पूर्ण झाले आहे. चावडी वाचनाच्या वेळी कोणाला काही आक्षेप असतील, सातबारामध्ये काही दुरु स्त्या असतील त्या तेथेच करण्यात आल्या. आॅनलाइन सातबाराची प्रिंट प्राप्त झाल्यावर त्यावर लाल शाईने दुरु स्त्या, तर प्रशासनाच्या वतीने तलाठ्याने हिरव्या शाईने त्या दूर करण्याबाबतची प्रक्रि या पार पडली. त्यानंतर परिपूर्ण आॅनलाइन सातबारा आता एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.
काही महिन्यांपूर्वी आॅनलाइन सातबारा शेतकºयांना मिळत होते, मात्र त्यावर तलाठ्याची सही घेण्यासाठी पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये जावे लागायचे, तसेच तलाठ्यांची भेट होणे हेही कठीण होते. यासाठी आता संबंधित ग्रामपंचायतींच्या तलाठ्यांची डिजिटल सही घेण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांना तलाठ्यांच्या डिजिटल सहीने सातबारा मिळण्यातील मार्ग मोकळा झाला आहे.

तीन तालुक्यांत काम बाकी

११५ तालुक्यांपैकी म्हसळा, श्रीवर्धन आणि माणगाव या तालुक्यांमध्ये डिजिटल सहीचे सातबारा उपलब्ध होणार नाहीत. येथील काम लवकरच पूर्ण केल्यानंतर तेथेही डिजिटल सहीचे सातबारा मिळणार असल्याचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
२१५ तालुक्यातील एक हजार ९७१ गावातील तब्बल एक लाख १४ हजार १७ सर्व्हेनंबरपैकी एक लाख ११ हजार ९०६९ सर्व्हेनंबर सातबारावर अंतिम करण्यात आले आहेत. त्याची टक्केवारी ९८.१६ टक्के आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रधान सचिवांनी संवाद साधला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

३मुरु ड, पेण, पनवेल, तळा, सुधागड, पोलादपूर, श्रीवर्धन आणि म्हसळा या तालुक्यांमध्ये १०० टक्के ई-चावडी वाचनाचा कार्यक्र म पूर्ण झाला आहे. अद्यापही अलिबाग २, उरण ३, कर्जत ८, खालापूर ६, रोहे २, महाड ३ अशा एकूण २७ गावांमध्ये चावडी वाचनाचा कार्यक्र म होणे बाकी आहे.

४आॅनलाइन सातबारा सहज उपलब्ध होत आहे. ही शेतकºयांसाठी चांगली बाब आहे. त्यामुळे शेतकºयांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. बहुतांश शेतकºयांकडे संगणक नसल्याने त्यांना त्याची प्रिंट हवी असल्यास ती घेण्यासाठी आॅनलाइन सेंटरमध्ये जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांचा धंदा तेजीत राहणार आहे. आॅनलाइन सातबाराचे वेळोवेळी अपग्रेडेशन होणेही तितकेच गरजेचे आहे.

५अपग्रेडेशन केल्यावर त्यांनी पुन्हा खात्री करु न घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित खातेदाराने सजग राहणे गरजे आहे. खातेदाराने महिन्याच्या महिन्याला सर्व्हेनंबरच्या साताबारावर काही फेरफार झाली नाही ना याची माहिती घेणे गरजेचे आहे.
 

Web Title: 7/12 digitally corrected online registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.