पोलादपूर तालुक्यातील ७२२ विद्यार्थी उत्तीर्ण
By admin | Published: June 14, 2017 03:12 AM2017-06-14T03:12:12+5:302017-06-14T03:12:12+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ मुंबई विभागीय मंडळ वाशी नवी मुंबई यांच्यामार्फत मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल
- लोकमत न्यूज नेटवर्क
पोलादपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ मुंबई विभागीय मंडळ वाशी नवी मुंबई यांच्यामार्फत मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल १३ जून रोजी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. या परीक्षेत तालुक्यातून १९ माध्यमिक शाळांमधून एकूण ८३१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी एकूण ७२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पोलादपूर तालुक्याचा एकूण निकाल ८६.९८ टक्के इतका लागला आहे.
तालुक्यातील विद्यामंदिर पोलादपूरचा निकाल ८५.७१ टक्के, शा. शं. जाधव न्यू इंग्लिश स्कूल पळचिल ९४.११, कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडे ९४.८२ टक्के, माध्यमिक विद्यालय सवाद ८३.३१, नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय देवळे १००, माऊली प्रशाला कोतवाल ९६.२९, माध्यमिक विद्यालय साखर १००, तानाजी शेलारमामा प्रशाला उमरठ १००, श्रीराम विद्यालय लोहारे ८२.८३, वरदायिनी माध्य व उच्च माध्य. विद्यालय कापडे ९५.४८, न्यू इंग्लिश स्कूल पैठण ६९.५६, हाजीअली अनवारे हायस्कूल वावे १००, न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे ८१.४८, न्यू इंग्लिश स्कूल ओंबळी १००, पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय गोळेगणी ९३.७५, गणेशनाथ महाराज विद्यालय कुडपण ६०, यशवंत इंग्लिश मिडियम स्कूल पोलादपूर १००, शंकरराव महाडिक विद्यालय पोलादपूर १००, जाल आणि ताल विद्यालय २६.४७ टक्के असा शाळानिहाय निकाल जाहीर झाला आहे. त्यापैकी तालुक्यात एकूण ७ शाळा १०० टक्के निकालाच्या मानकरी ठरल्या असून तालुक्याचा शैक्षणिक आलेख उंचावत असल्याचे या निकालावरून दिसून येत आहे.
या परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.