७३ दिवसांनी खणखणला दूरध्वनी!
By admin | Published: November 19, 2015 12:25 AM2015-11-19T00:25:28+5:302015-11-19T00:25:28+5:30
मुरुड तालुक्यातील बोर्ली दूरध्वनी कार्यालयातील दूरध्वनी अखेर ७३ दिवसांनी खणखणले असल्याने ग्राहकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे.
बोर्ली-मांडला : मुरुड तालुक्यातील बोर्ली दूरध्वनी कार्यालयातील दूरध्वनी अखेर ७३ दिवसांनी खणखणले असल्याने ग्राहकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे.
भारत संचार निगमच्या बोर्ली दूरध्वनी कार्यालयातील ७ सप्टेंबर २०१५ पासून यंत्रणा ही ठप्प झाली होती. त्या दिवसांपासून दूरध्वनी बंद पडले ते अखेर ७३ दिवसांनी म्हणजे १८ नोव्हेंबर २०१५ ला सुरू झाले. बोर्ली दूरध्वनी कार्यालयातील आधुनिक यंत्रणा बसविली आहे. यामुळे ग्रामपंचायतीला नेटची सुविधा उपलब्ध होणार आहे.
७३ दिवस दूरध्वनी बंद होते. ज्यांनी देयके भरली आहे त्यांना रिफंड देण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे मुरुड तालुक्याचे कनिष्ठ अभियंता रुपेश पाटील यांनी सांगितले. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा दूरध्वनी कार्यालयात अधिकारी नसल्यामुळे रेवदंडा कार्यालयाचा अधिभार रुपेश पाटील यांना देण्यात आला असल्याने त्यांना मुरुड तालुक्यातील आगरदांडा, मुरुड, काशिद, नांदगाव, बोर्ली, साळाव, चोरडे येथे असणाऱ्या दूरध्वनी कार्यालयाबरोबर रेवदंडा कार्यालयात सुद्धा काम करावे लागणार आहे. यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण पडला आहे.
वारंवार येथील बीएसएनएलची सेवा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत, यामुळे अनेकांचे नुकसान होत आहे. (वार्ताहर)