पेण : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये रायगड जिल्ह्यातील उच्च प्राथमिक पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ३७५ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. तर पूर्व माध्यमिक आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ३७३ अशा एकूण ७४८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.उच्च प्राथमिक पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दहा हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते. त्यापैकी १९०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या गटातील ३७५ विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळाली आहे. तर पूर्व माध्यमिक आठवीच्या गटात ६५३४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते. त्यापैकी १४४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ३७३ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. जिल्हात उच्च प्राथमिक (पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पनवेल तालुक्यातील सर्वाधिक तीन हजार १८५ तर सर्वात कमी तळा तालुक्यातून १७३ विद्यार्थी बसले होते. तर पूर्व माध्यमिक (आठवी) परीक्षेसाठी सर्वाधिक पनवेल एक हजार ९५४ तर सर्वात कमी तळा तालुक्यातून ८१ विद्यार्थी बसले होते.उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अलिबाग तालुक्यातील ७७३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील १५० उत्तीर्ण झाले असून, २८ शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. पेण ७२० पैकी उत्तीर्ण १६८ शिष्यवृत्तीस पात्र ३८, पनवेल ३१८५ पैकी उत्तीर्ण ६२५ शिष्यवृत्ती पात्र ८१, कर्जत ९५५ पैकी उत्तीर्ण ८६, शिष्यवृत्तीस पात्र ११, खालापूर ५५१ पैकी उत्तीर्ण १०० शिष्यवृत्तीस पात्र १९, सुधागड २७४ पैकी उत्तीर्ण ४० शिष्यवृत्तीस पात्र ९, रोहा ५९८ पैकी उत्तीर्ण १२४, शिष्यवृत्तीस पात्र ३६, माणगाव ८४४ पैकी उत्तीर्ण १५३ शिष्यवृत्तीस पात्र ४३, महाड १०२६ पैकी उत्तीर्ण २१४ शिष्यवृत्तीस पात्र ६३, पोलादपूर २३२ पैकी उत्तीर्ण ३८, शिष्यवृत्तीस पात्र १०, म्हसळा २९१ पैकी उत्तीर्ण १४ शिष्यवृत्तीस पात्र ४, श्रीवर्धन २६१ पैकी उत्तीर्ण १३ शिष्यवृत्तीस पात्र २, मुरुड २४६ पैकी उत्तीर्ण २७ पात्र ४, तळा १७३ पैकी उत्तीर्ण २८ शिष्यवृत्तीस पात्र ७ आणि उरण ५७२ पैकी उत्तीर्ण १२१ शिष्यवृत्तीस पात्र २० अशी आहे.पूर्व माध्यमिक (आठवी) परीक्षेसाठी तालुकानिहाय एकूण बसलेले, उत्तीर्ण आणि शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले अनुक्रमे पुढीलप्रमाणे : अलिबाग ५५८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते १३८ उत्तीर्ण ४६ शिष्यवृत्तीसाठी पात्र. पेण ४५६, १३७, ३७, पनवेल १९५४, ४४३, ७२, कर्जत ३८८, ७०, २१, खालापूर ३५६, ९१, २२, सुधागड १८१, १७, ५, रोहा ४४२, १३४, २८, माणगाव ४५२, ७५, २४, महाड ५८९, १६१, ५५, पोलादपूर १६६, २३, १०, म्हसळा १९५, ८, २, श्रीवर्धन १७८, ६, ५, मुरुड २०५, २५, ३, तळा ८१, १०, ९, उरण ३३५, १०२, ३४ अशी स्थिती आहे.
रायगड जिल्ह्यातील ७४८ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 2:06 AM