रायगड : जिल्ह्यात शनिवारी (05सप्टेंबर ) 769 नव्या कोरोना पॉङिाटीव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या 29 हजार 923 वर पोचली आहे. गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. दिवसभरात 14 जणांचा मृत्यू झाला आहे, आतार्पयत एकूण 884 जणांना मृत्यूने कवटाळले आहे तर,आतार्पयत 25 हजार 245 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शनिवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात-230, पनवेल ग्रामीणमध्ये-104, उरण- 14, खालापूर-25, कजर्त-34, पेण-53, अलिबाग- 109, मुरुड-00, माणगाव-42, तळा-00, रोहा-30, सुधागड-15, श्रीवर्धन-05, म्हसळा-00, महाड-90, पोलादपूर-18 असे एकूण 769 रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात पनवेल महानगरपालिका-165, पनवेल ग्रामिण-85, उरण-17, खालापूर-48, कजर्त-05, पेण-09, अलिबाग-55, मुरुड-04, माणगाव-25, तळा-00, रोहा-17, सुधागड-07, श्रीवर्धन-02, म्हसळा-03, महाड-07, पोलादपूर-02 असे एकूण 451 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर दिवसभरात 14 रुग्णांचा मृत्यु झाला. आतार्पयत बाधित रु ग्णांपैकी 25 हजार 245 रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 884 रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 4678 पॉङिाटीव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहेत.........