उरणमध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 11:30 AM2023-08-15T11:30:24+5:302023-08-15T11:30:46+5:30
उरण नगरपरिषदेतही मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
- मधुकर ठाकूर
उरण : उरण तालुक्यातील ठिक ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
उरण तहसील कार्यालयात देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा करण्यात आला.उरण तहसीलदार डॉ.उध्दव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी पोलिसांनी ध्वजाला मानवंदना दिली.याप्रसंगी उरण वपोनि सतीश निकम, पोलिस अधिकारी, विविध शासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, पुढारी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
उरण नगरपरिषदेतही मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नगरसेवक, कर्मचाऱ्यांच्या उपस्थित होते. उरण पंचायत समितीच्या प्रांगणातही गटविकास अधिकारी समीर वाठावकर यांच्या हस्ते आणि माजी सदस्य, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.राज्यातील सर्वात मोठी मच्छीमार सहकारी संस्था व येथील शाळेत करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.
जेएनपीएमध्येही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष उन्मेष वाघ, कामगार ट्र्स्टी दिनेश पाटील, रवींद्र पाटील, जेएनपीएचे विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.