तालुक्यात प्रकल्पांसाठी 79 लाख मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 11:47 PM2021-02-27T23:47:04+5:302021-02-27T23:47:38+5:30
आदिती तटकरे : म्हसळा जानसई रिव्हरफ्रंट सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसळा : रायगड जिल्हा पालकमंत्री तथा श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार अदिती तटकरे यांचे माध्यमातून म्हसळा तालुका शहराच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.माणगाव श्रीवर्धन राज्य मार्गाला लागुनच जानसई नदीवरील हिंगुलकरिण देवीचे जागृत देवस्थान "हिंगुलडोह "आणि गणेश विसर्जन कट्ट्यावर म्हसळा नगरपंचायतीचे माध्यमातून पालकमंत्री आदिती तटकरे यांचे मार्गदर्शन व त्यांचे नेतृत्वाने जानसई रिव्हरफ्रंट व हिंगुलडोह सुशोभीकरण प्रकल्पाचे काम त्यांनी हाती घेतले आहे.या प्रकल्पाच्या विकासासाठी म्हसळा नगरपंचायत नागरी जनसुविधा अंतर्गत ७९ लाख रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली असल्याचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी सांगितले.
शुक्रवारी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रकल्पाची पहाणी करताना नदी संवर्धन करणे आणि पर्यटन विकासाचे उद्देशाने म्हसळा हिंगुलडोह विकासाला आवश्यक लागणारा निधी कमी पडु देणार नाही. सुशोभीकरण करण्यासाठी प्रकल्पात या ठिकाणच्या अधिकतम जागेवर विद्युतरोषणाई,गार्डन, पार्क,स्वागत कमान आदी सुविधा उभारण्यात याव्यात असे संबंधीत अधिकारी वर्गाला सुचित केले.
हिंगुलडोह हे ठिकाण म्हसळा शहरातील जाण्यायेण्याचे स्वागत नाका आहे.बारमाही पाणी असलेल्या जानसई नदीच्या हिंगुलडोह परिसरात नेहमीच थंडगार वातावरण अनुभवण्यास मिळतो. हा परिसर अधिकपणे स्वच्छ आणि सुशोभित झाला तर स्थानिकांना आणि पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल या उद्देशाने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नियोजित प्रकल्प पहाणी केली.
दौऱ्यावेळी त्यांचे समावेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस अली कौचाली, तालुका अध्यक्ष समीर बनकर,सभापती उज्वला सावंत, उपसभापती मधुकर गायकर,
श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे,तहसीलदार शरद गोसावी, मुख्यकार्यकारी अधिकारी मनोज उकिर्डे, माजी सभापती नाझीम हसवारे, माजी सभापती छाया म्हात्रे, प.स.सदस्य संदीप चाचले,माजी उपनगराध्यक्ष नासिर दळवी, ग्रामस्थ मंडळ सचिव सुशिल यादव, शशिकांत शिर्के,प्रशांत करडे आदी मान्यवर उपस्थित होते.
असे होणार काम
हिंगुलडोह हे ठिकाण म्हसळा शहरातील जाण्यायेण्याचे स्वागत नाका आहे हिंगुलडोह सुशोभीकरण
करण्याच्या पहिल्या टप्प्यात नदी संवर्धन बांधबंदिस्ती करणे, जमीन सपाटीकरण, गणपती, देवी विसर्जन कट्टा
पायऱ्या दुरुस्ती व
विस्तार रणे, पार्क, पार्किंग आदी कामाला सुरुवात करण्यात येणार
आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळणार
आहे.