शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तालुक्यात प्रकल्पांसाठी 79 लाख मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 11:47 PM

आदिती तटकरे : म्हसळा जानसई रिव्हरफ्रंट सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : रायगड जिल्हा पालकमंत्री तथा श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार अदिती तटकरे यांचे माध्यमातून म्हसळा तालुका शहराच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.माणगाव श्रीवर्धन राज्य मार्गाला लागुनच जानसई नदीवरील हिंगुलकरिण देवीचे जागृत देवस्थान "हिंगुलडोह "आणि गणेश विसर्जन कट्ट्यावर म्हसळा नगरपंचायतीचे माध्यमातून पालकमंत्री आदिती तटकरे यांचे मार्गदर्शन व त्यांचे नेतृत्वाने जानसई रिव्हरफ्रंट व हिंगुलडोह सुशोभीकरण प्रकल्पाचे काम त्यांनी हाती घेतले आहे.या प्रकल्पाच्या विकासासाठी म्हसळा नगरपंचायत नागरी जनसुविधा अंतर्गत ७९ लाख रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली असल्याचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी सांगितले.

शुक्रवारी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रकल्पाची पहाणी करताना नदी संवर्धन करणे आणि पर्यटन विकासाचे उद्देशाने म्हसळा हिंगुलडोह विकासाला आवश्यक लागणारा निधी कमी पडु देणार नाही. सुशोभीकरण करण्यासाठी प्रकल्पात या ठिकाणच्या अधिकतम जागेवर विद्युतरोषणाई,गार्डन, पार्क,स्वागत कमान आदी सुविधा उभारण्यात याव्यात असे संबंधीत अधिकारी वर्गाला सुचित केले. हिंगुलडोह हे ठिकाण म्हसळा शहरातील जाण्यायेण्याचे स्वागत नाका आहे.बारमाही पाणी असलेल्या जानसई नदीच्या हिंगुलडोह परिसरात नेहमीच थंडगार वातावरण अनुभवण्यास मिळतो. हा परिसर अधिकपणे स्वच्छ आणि सुशोभित झाला तर स्थानिकांना आणि पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल या उद्देशाने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नियोजित प्रकल्प पहाणी केली. 

दौऱ्यावेळी त्यांचे समावेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस अली कौचाली, तालुका अध्यक्ष समीर बनकर,सभापती उज्वला सावंत, उपसभापती मधुकर गायकर,श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे,तहसीलदार शरद गोसावी, मुख्यकार्यकारी अधिकारी मनोज उकिर्डे, माजी सभापती नाझीम हसवारे, माजी सभापती छाया म्हात्रे, प.स.सदस्य संदीप चाचले,माजी उपनगराध्यक्ष नासिर दळवी, ग्रामस्थ मंडळ सचिव सुशिल यादव, शशिकांत शिर्के,प्रशांत करडे आदी मान्यवर उपस्थित होते.

असे होणार कामहिंगुलडोह हे ठिकाण म्हसळा शहरातील जाण्यायेण्याचे स्वागत नाका आहे हिंगुलडोह सुशोभीकरण करण्याच्या पहिल्या टप्प्यात नदी संवर्धन बांधबंदिस्ती करणे, जमीन सपाटीकरण, गणपती, देवी विसर्जन कट्टा पायऱ्या दुरुस्ती व विस्तार रणे, पार्क, पार्किंग आदी कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळणार आहे.