मुरुडमध्ये ८० टक्के भातलावणी पूर्ण, तालुक्यात १,४१४ मिलिमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 11:43 PM2020-07-17T23:43:14+5:302020-07-17T23:43:36+5:30
सर्वात जास्त भातपीक हे तालुक्यातील आंबोली, शिघ्रे, तळेखार, सावली आदी ग्रामपंचात हद्दीत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भातपिकाला जास्त पावसाची गरज असते.
मुरुड : तालुक्यात सततधार पाऊस असून, हा पाऊस भात पिकाला पोषक असल्याने सर्व शेतकऱ्यांच्या शेतीमधील लावणीची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. मुरुड तालुक्यात सर्वात जास्त पावसाळी हंगामात भाताचे पीक लावले जाते. सुमारे ३,३०० हेक्टर क्षेत्रात भातपीक घेतले जाते. पावसाळा हा नियोजित वेळेत सुरू झाल्याने, भाताचे राब लवकर तयार होऊन आता सर्वत्र लावणी सुरू असून, शेतकरी सहकुटुंब कामात व्यस्त झालेला दिसून येत आहे.
सर्वात जास्त भातपीक हे तालुक्यातील आंबोली, शिघ्रे, तळेखार, सावली आदी ग्रामपंचात हद्दीत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भातपिकाला जास्त पावसाची गरज असते. त्यामुळे येथे भातपिकाला खूप महत्त्व दिले जाते. मुरुड तालुक्यात आतापर्यंत १,४४१ मिलिमीटर एवढा पाऊस पडल्याने, येथील विहिरी, तलाव, नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत. त्याचप्रमाणे, शेतामध्यही खूपसे पाणी साचले आहे. त्यामुळे असे पाणी भातशेतीला आवश्यक असल्याने भातलावणीच्या कामाला वेग प्राप्त झाला आहे.
उत्पादित भाताचा येथील शेतकरी संपूर्ण वर्षभर आपल्या कुटुंबासाठी वापर करून, अतिरिक्त उत्पादित भात विकून कुटुंबाचे पालनपोषण करीत असतो. येथे एका दिवसात १५४ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. शेतीसाठी माणसे अपुरी पडली, तर मजुरीवर माणसे घेऊन सध्या लावणीची कामे जलद गतीने पूर्ण होताना दिसत आहेत. किसान क्रांती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीधर जंजिरकर यांनी तालुक्यातील ८० टक्के भातलावणी पूर्ण झाली असल्याचे सांगितले.
भाताच्या पिकासाठी विमा हप्ता : १० गुंठ्यासाठी ९१ रुपये, एकरी ३६४ रु., तर हेक्टरी ९१० रुपये असून, हेक्टरी ४५,५०० रु पये विमा संरक्षण दिले जाणार आहे. नाचणी पिकाच्या १० गुंठ्यांसाठी विमाहप्ता ४० रुपये, एकरी १६० रुपये व हेक्टरी ४०० रुपये असून, विम्याचे संरक्षण हेक्टरी २०,००० रुपये आहे. या विमा योजनेची माहिती कृषी सहायकांमार्फत गावोगावी देण्यात येत असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे विश्वनाथ अहिरे यांनी सांगितले.
शेतकºयांना आवाहन
भात व नागली पीक घेणाºया शेतकºयांना ऐच्छिक कुळाने
वा भाडेपट्टीने शेती कसणाºयांवर पेरणी ते काढणीदरम्यान नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास पंतप्रधान पीकविमा योजनेचे संरक्षण प्राप्त करण्यासाठी सरकारी सेवा केंद्रावर आवेदन पत्रे येत्या ३१ जुलैपर्यंत
सादर करून लाभ घेण्याचे आवाहन मुरुड तालुका
कृषी अधिकारी विश्वनाथ आहिरे यांनी केले आहे.