जिल्ह्यातील ८,००० वारकरी पंढरीकडे मार्गस्थ

By admin | Published: July 10, 2016 12:33 AM2016-07-10T00:33:46+5:302016-07-10T00:33:46+5:30

सगळ््या वारकऱ्यांचे एकच ध्येय असते, ते म्हणजे पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याचे; डोळे भरून आपल्या विठूरायाचे सावळे रूप पाहण्याचे. आणि हेच सावळे गोजिरे रूप पाहण्यासाठीच

8,000 Warkari Pandharpur is situated in the district | जिल्ह्यातील ८,००० वारकरी पंढरीकडे मार्गस्थ

जिल्ह्यातील ८,००० वारकरी पंढरीकडे मार्गस्थ

Next

- जयंत धुळप, अलिबाग

सगळ््या वारकऱ्यांचे एकच ध्येय असते, ते म्हणजे पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याचे; डोळे भरून आपल्या विठूरायाचे सावळे रूप पाहण्याचे. आणि हेच सावळे गोजिरे रूप पाहण्यासाठीच रायगड जिल्ह्यातील २०० हून अधिक गावांतील तब्बल आठ हजार वारकरी पंढरपूरच्या वारीस निघाले असल्याची माहिती वारकरी संप्रदायाचे निरुपणकार महाड येथील प्रशांत महाराज पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महाड-पोलादपूरचे आमदार भरतशेठ गोगावले या वारीत सहभागी झाले आहेत. आपल्या मतदारसंघाबरोबरच राज्यातील सर्व जनतेचे सुस्वास्थ्य आणि उत्तम पीकपाण्यासाठी ते पांडुरंगाला गाऱ्हाणे घालणार आहेत.
पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी हा केवळ एक प्रवास नसून ही भक्तीची ऊर्जा असते. असीम चैतन्याचं लोण, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संतमंडळींच्या पालख्या मिरवत वारकऱ्यांचा जनसमुदाय आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होतो आणि चंद्रभागेकाठी अपार श्रद्धेचा आणि नि:स्वार्थ प्रेमाचा महासंगम निर्माण होतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक म्हणजेच वारी. इथे भेदभावाला जागा नाही. जातपात कोणी मानत नाही. पंढरपूर म्हणजे जणू भक्तीचा महासागर आणि वारी म्हणजे अनंत अडचणींवर मात करून या महासागराला येऊन मिळणारी भक्तगणांची नदीच, अशी भावना वारीत सहभागी झालेले रायगड जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी व्यक्त केली आहे.
रायगड जिल्हा न्यायालयातील अ‍ॅड. भारती काळण गेली २० वर्षे सातत्याने वारीत सहभागी होत असतात. यंदा अलिबागमधील १५ वकील या वारीमध्ये सहभागी झाले आहेत.
पांडुरंगाची वारी म्हणजे आनंदाचा सोहळा. संतसज्जनांच्या सहवासात प्रापंचिक दु:खांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा हा अट्टाहास आपल्याला आध्यात्मिकतेची गोडी लावून जातो. संतमहात्म्यांनी दाखवलेल्या या अनुभवसंपन्न वाटेवर गेल्या शेकडो वर्षांपासून वैष्णवांचा हा प्रवास सुरूच असल्याची भावना या वारीच्या मार्गावर मोफत आरोग्यसेवा देण्याकरिता वारीत सहभागी होणारे डॉ. रमेश तेलवडे यांनी व्यक्त केली आहे.

एसटी महामंडळाचे पांडुरंगाशी अनोखे नाते
१५ ते २० दिवस काढून वारीमध्ये जाता येत नाही, मात्र वारकऱ्यांकरिता राज्य परिवहन विभागाच्या रामवाडी (पेण) विभागातून यंदा एसटीच्या आठ बसेस रवाना होणार असल्याची माहिती जिल्ह्यातून एसटीच्या रामवाडी विभागाचे वाहतूक नियंत्रण प्रमुख संजय हर्डीकर यांनी दिली.
आषाढी एकादशीच्या आदल्या तीन-चार दिवस पुणे येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होत असते. या भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनास घेऊन जाण्याकरिता पेण विभागाच्या २० एसटी बसेस सोमवारी व १० बसेस बुधवारी अशा एकूण ३० बसेस पुण्याला भक्तांच्या सेवेसाठी रवाना करण्यात येणार असल्याची माहिती हर्डीकर यांनी दिली.

Web Title: 8,000 Warkari Pandharpur is situated in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.