८३ वर्षीय आजीची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:44 AM2020-08-01T00:44:21+5:302020-08-01T00:44:29+5:30

२५ दिवसांनंतर यश : जिल्हा रु ग्णालयातून सुखरूप घरी परत

83-year-old grandmother defeated Corona | ८३ वर्षीय आजीची कोरोनावर मात

८३ वर्षीय आजीची कोरोनावर मात

Next

निखिल म्हात्रे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : इच्छाशक्ती दांडगी असली, तर अशक्य गोष्ट ही शक्य होऊ शकते, याचा अनुभव अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आला आहे. कोरोना झालेल्या ८३ वर्षीय आजीची तब्येत अत्यावस्थ होती. मात्र, असे असतानाही २५ दिवसांनंतर कोरोनावर मात केली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील रहिवासी असून, शुक्रवारी जिल्हा रु ग्णालयातून त्या सुखरूप घरी परत गेल्या आहेत.


श्रीवर्धन शहरातील ८३ वर्षीय महिलेवर महाड येथील रु ग्णालयात पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी रुग्णालयात त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर, त्यांना ५ जुलै रोजी अलिबाग येथे जिल्हा सामान्य
रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयोवृद्ध असल्याने त्यांच्या शरीरातील आॅक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. नातेवाइकांनीही त्यांची आशा सोडू देत डॉक्टरांनाही तुमच्या परीने प्रयत्न करण्यास सांगितले होते. मात्र, या परिस्थितीतही जिल्हा सामान्य
रुग्णालयाचे डॉ.राजीव तांबाळे, डॉ. विक्रमजीत पाडोळे, डॉ.अपूर्वा पाटील यांनी आजीला कोरोनामुक्त करण्यासाठी २५ दिवस अहोरात्र प्रयत्न केले ते सफल झाले. डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार, तर दुसरीकडे आजीची जगण्याची तीव्र इच्छा, यामुळे कोरोनासारख्या महाभयंकर रोगावर त्यांनी मात केली.
दरम्यान, त्यांचे पतींचे त्या उपचार घेत असताना दुर्धर आजाराने निधन झाले. मात्र, ही माहिती त्या आजींपासून लपवून ठेवण्यात आलेली आहे. जिल्हा सामान्य
रुग्णालयातून आज या आजींना घरी सोडण्यात आले.

चढ्या भावाने विक्री केल्यास कारवाई :
जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ.सुहास माने, उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, डॉ.राजीव तांबाळे, डॉ.अपूर्वा पाटील, मेट्रेन मोरे आरोग्य सेवक, सेविका यांनीही आजींना गुलाबपुष्प देऊन निरोप दिला. या ८३ वर्षीय आजीचा आदर्श कोरोनाबाधितांनी घेतला पाहिजे.

Web Title: 83-year-old grandmother defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.