गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उरण शहरावर ८५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2023 02:22 PM2023-12-22T14:22:43+5:302023-12-22T14:22:50+5:30

सीसीटीव्ही बसण्यासाठी ओएनजीसीची मदत मिळणार आहे.

85 CCTV cameras watch over Uran city to curb crime | गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उरण शहरावर ८५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उरण शहरावर ८५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

मधुकर ठाकूर

उरण : उरण परिसराचे औद्योगिकरण होत असताना गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उरण शहरातच ८५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.येथील ओएनजीसी प्रकल्पाच्या सहकार्यातून हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असुन त्याचे नियंत्रण उरण पोलिस ठाण्यातुन करण्यात येणार असल्याची माहिती वपोनि सतीश निकम यांनी दिली.

मराठा आरक्षणासाठी असलेली आंदोलनाची शक्यता, दत्तजयंती, नाताळ, थर्टी फस्ट आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने  उरण परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी (२१) रात्री निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधला.वाढते औद्योगिकरण , भविष्यात सुरू होणारी रेल्वे प्रवासी वाहतूक यामुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असुन यामुळे गांभीर्यही अधिक वाढणार आहे.त्यामुळे गुन्हेगारींवर वचक ठेवण्यासाठी उरण शहरातच ८५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.सीसीटीव्ही बसण्यासाठी ओएनजीसीची मदत मिळणार आहे. शहरात याआधीही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.मात्र ते सध्याच्या काळात निकामी झाले असल्याची कबुली वपोनि सतीश निकम यांनी यावेळी दिली.त्यामुळे सीसीटीव्हींच्या देखभालीचाही भार उचलावा यासाठी ओएनजीसी व्यवस्थापनाशी चर्चा सुरू असल्याचेही निकम यांनी सांगितले.

यावेळी मराठा आरक्षणासाठी असलेली आंदोलनाची शक्यता, दत्तजयंती, नाताळ, थर्टी फस्ट आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने  उरण परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचीही माहितीही वपोनि सतीश निकम यांनी दिली.

Web Title: 85 CCTV cameras watch over Uran city to curb crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.