शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

महामार्गावर २०१७ मध्ये ८७८ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 7:17 AM

गोवा महामार्ग हा सततच्या अपघातामुळे मृत्यूचा सापळा बनलेला आहे. दरवर्षी हजारो अपघात होत असून हजारो प्रवासी जखमी तर शेकडो मृत्युमुखी पडत आहेत.

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई - गोवा महामार्ग हा सततच्या अपघातामुळे मृत्यूचा सापळा बनलेला आहे. दरवर्षी हजारो अपघात होत असून हजारो प्रवासी जखमी तर शेकडो मृत्युमुखी पडत आहेत. मावळत्या २०१७ची अपघाताची आकडेवारीमध्ये पनवेल पळस्पे ते कसाल (सिंधुदुर्ग) या ४५० कि.मी.च्या अंतरामध्ये ८७८ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातामध्ये १२८३ प्रवासी जखमी झाले असून १०३ प्रवाशांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर या मार्गावरून बेदरकारपणे चालणाºया व नियमाचा उल्लंघन करणाºया वाहनांची तपासणी करत १,०१,५०४ वाहनचालकांवर कारवाई करत २,०३,४७३०० रुपये दंड वसूल केला आहे.मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणवासीयांचा महत्त्वाचा महामार्ग आहे. नेहमी सुट्टीच्या काळात व शिमगा व गणपती सणाच्या काळातला महामार्ग मोठ्या प्रमाणात गजबजलेला असतो. दरवर्षी महामार्ग पोलीस, महामार्ग बांधकाम विभाग, आरटीओ यांच्याकडून अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. वाहनचालकांना सुरक्षिततेबाबतचे धडे दिले जातात. डोळे तपासणी शिबिर घेतली जातात. मात्र, एवढे होत असताना वाहनचालकांकडून त्याचप्रमाणे सहकार्यदेखील अपेक्षित असते. महामार्गावर पडणारे खड्डे, अवघड वळण, अरुंद महामार्ग हे सर्व पाहिले तरी नेहमी वाहनचालकांच्या चुकांमुळेच अपघात घडताना दिसून येतात. २०१७मध्ये महामार्ग वाहतूक शाखेमार्फत मोठ्या प्रमाणात वाहनचालकांवर कारवाई करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वाहनचालकांवर ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. अपघातांना रोखता येईल. अनेक वर्षांपासून या मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. या अपघातांना थांबविण्यासाठी उपाय अद्यापही कोणाकडे नाही. हे सर्व झालेल्या अपघाताची नोंदीव्यतिरिक्त महामार्गावर किरकोळ अपघातांची नोंद नाही. वाहनचालकांनी आपसामध्ये तडजोड करून मिटवली आहे.मुंबई कोकणात येणारे वाहन चालक हे नेहमी नवीन असल्याने त्यांना रस्त्याचा अनुभव नसतो. घाट विभागात अनेक सुरक्षिततेचा अभाव आहे. अपघातामध्ये तरुणांचा समावेश जास्त आहे. अरुंद रस्ता, खड्डे, महामार्गावर लावलेलं दिशा दर्शनाना फलक कमी आहेत. तर खराब अवस्थेत आहेत. साइडपट्टी नाही. पावसामध्ये रस्त्याकडेला उगवलेल्या गवतामुळे समोरील वाहनांना येणारे वाहन दिसत नाही. वळणाशेजारी असलेल्या टेकड्या व वाहनचालकांनी नियमाचे पालन करूनच वाहन चालवणे. यामुळेच महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात.- डी. के. पाटील,पोलीस निरीक्षक महामार्गवाहतूक शाखा, रत्नागिरी 

टॅग्स :Accidentअपघातnewsबातम्या