रायगडमध्ये दहा महिन्यांत 9 लाख 46 हजार दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:23 PM2020-11-19T23:23:41+5:302020-11-19T23:24:09+5:30

ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या ४ हजार ५८४ चालकांवर कारवाई

9 lakh 46 thousand fines collected in ten months in Raigad | रायगडमध्ये दहा महिन्यांत 9 लाख 46 हजार दंड वसूल

रायगडमध्ये दहा महिन्यांत 9 लाख 46 हजार दंड वसूल

googlenewsNext

निखिल म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात केलेल्या संचारबंदीपासून आतापर्यंत ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या ४ हजार ५८४ वाहन चालकांकडून मागील १० महिन्यांत ९ लाख ४६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकांना समजही देण्यात आली आहे. तर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत तालुक्याच्या मुख्य ठिकाणी फलकही लावण्यात आले आहेत.


जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या दहा महिन्यांत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करताना शालेय विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करता येत आहे. अनेक विद्यार्थी आपल्या महागड्या मोटारसायकल आणि स्कूटर घेऊन शाळा, काॅलेजमध्ये येत असतात. परवाना, महत्त्वाची कागदपत्रे नसणे, ट्रिपल सीट अशा प्रकारे वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रकार विद्यार्थ्यांकडून घडत असतात. त्यामुळे नागरिकांसह महाविद्यालयीन मुलांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे म्हणून सध्या पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.


मागील १० महिन्यांचा ट्रिपल सीट वाहन चालविले म्हणून कारवाईचा आकडा पाहता ऑक्टोबर महिन्यात सर्वांत जास्त ३३ लाख १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात ४७७ प्रकरणे झाली असून ९५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

अलिबाग शहरात सर्वाधिक दंड वसूल
ट्रिपल सीट गाडी हाकणाऱ्यांविरोधात अलिबाग शहरात वाहतूक विभागाने सर्वाधिक कारवाई करीत दंड वसूल केला आहे. तसेच दंडात्मक कारवाई केलेल्या वाहन चालकांना समजही देण्यात आली आहे. ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या ४ हजार ५८४ वाहन चालकांकडून दंड वसूल केला आहे.


ऑक्टोबरमध्ये १,६५६ चालकांवर कारवाई 
अनलाॅक ५ मध्ये सारे काही सुरळीत झाल्यावर नागरिक मोठ्या प्रमाणावर घरातून बाहेर पडले. अचानक बाहेर पडलेले नागरिक वाहतुकीचे नियमही विसरल्याने ऑक्टोबर महिन्यात १,६५६ वाहन चालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ३ लाख ३१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.

फेब्रुवारी महिन्यात ४०४ प्रकरणे झाली 
फेब्रुवारी महिन्यात ४०४ प्रकरणे झाली असून ८० हजार ८०० रुपयांचा दंड, मार्च महिन्यात ४९२ प्रकरणे झाली असून ९८ हजार ४०० रुपयांचा दंड, एप्रिल महिन्यात १४९ प्रकरणे झाली असून २९ हजार ८०० रुपयांचा दंड, मे महिन्यात ३३४ प्रकरणे झाली असून ६६ हजार ८०० रुपयांचा दंड, जून महिन्यात ४०४ प्रकरणे झाली असून ८० हजार ८०० रुपयांचा दंड, जुलै महिन्यात २४८ प्रकरणे झाली असून ४९ हजार ६०० रुपयांचा दंड, ऑगस्ट महिन्यात २०२ प्रकरणे झाली असून ४० हजार ४०० रुपयांचा दंड, सप्टेंबर महिन्यात ३६८ प्रकरणे झाली असून ७३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

रायगड पोलीस क्षेत्रातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध विषेश मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अल्पवयीन, शालेय विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बालकांकडून सध्या दंड वसूल करण्यात येत आहे. याबरोबरच त्या मुलांचे व त्यांच्या पालकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न रायगड पोलीस विभाग करीत आहेत.
-  रवींद्र शिंदे, वाहतूक पोलीस निरीक्षक, रायगड जिल्हा 

Web Title: 9 lakh 46 thousand fines collected in ten months in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस