उरणातील जासई, चिरनेर, दिघोडे या तीनही ग्रामपंचायतींच्या ४१ जागांसाठी ९० उमेदवार : ४५ उमेदवारांची माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 06:00 PM2023-10-25T18:00:35+5:302023-10-25T18:01:08+5:30
रण तालुक्यातील जासई,चिरनेर आणि दिघोडे या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका ५ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.
- मधुकर ठाकूर
उरण : उरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच आणि ४१ सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर ९० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.
उरण तालुक्यातील जासई,चिरनेर आणि दिघोडे या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका ५ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. बुधवारी (२५) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच शेवटची तारीख होती. या शेवटच्या दिवशी जासई ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ३ तर १७ सदस्यपदासाठी ३४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. चिरनेर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी २ तर १४ सदस्यपदासाठी २८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
दिघोडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ४ तर ९ सदस्यपदासाठी १९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.असे तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ९ तर तीनही ग्रामपंचायतींच्या ४१ सदस्यपदासाठी ८१ असे एकूण ९० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.बुधवारी सरपंच पदाचे ७ तर सदस्य पदाचे ३८ असे ४५ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत.तीन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारांना निवडणूक चिन्हांचेही वाटप करण्यात आले असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.