सायकलवर ९० कि.मी. अंतर तीन तासांत पार; गजानन डुकरे यांच्या कामगिरीचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 01:24 AM2021-03-22T01:24:04+5:302021-03-22T01:24:14+5:30
ॲड. गजानन डुकरे यांनी ९० किलोमीटरचे अंतर केवळ ३ तास २८ मिनिटांमध्ये पूर्ण करून त्यांनी कर्जत तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा जागतिक स्तरावर उंचावले आहे.
नेरळ : कर्जत तालुक्यात नेरळ येथील व्यवसायाने वकील असलेल्या गजानन डुकरे यांनी २१ मार्च रोजी सायकलवर ९० किलोमीटर अंतर अवघ्या ३ तास २८ मिनिटांत पार केले आहे. सायकलिंग राजगुरू भगतसिंग सुखदेव इंडियन फ्लॅग राईड वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्टमध्ये भारतातून भाग घेतला होता. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ॲड. गजानन डुकरे यांनी ९० किलोमीटरचे अंतर केवळ ३ तास २८ मिनिटांमध्ये पूर्ण करून त्यांनी कर्जत तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा जागतिक स्तरावर उंचावले आहे. राजगुरू भगतसिंग सुखदेव इंडियन फ्लॅग राईड वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट राईडचे वैशिष्ट्य म्हणजे ९० कि.मी. राईड आपला तिरंगा झेंडा सायकलवर फडकवीत पूर्ण करायची होती व त्यांनी दिलेल्या वेळेपेक्षा पण कमी वेळेत म्हणजे १० तासांची राईड अवघ्या तीन तास २८ मिनिटांमध्ये यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यांच्या सार्थ कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या आधीही त्यांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सायकलवर तिरंगा झेंडा लावून ७२ किलोमीटरचे अंतर पावणेतीन तासांत पूर्ण केले होते. त्यावेळी ॲड. गजानन डुकरे यांनी ४०० हून अधिक सायकलपटूमध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला होता.