एसटीच्या ९० % फेऱ्या निवडणुकीसाठी रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:23 AM2019-04-17T00:23:54+5:302019-04-17T00:24:17+5:30
विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयात परत घेऊन येण्याकरिता राज्य परिवहन मंडळाच्या रायगड जिल्ह्यात तब्बल ६२८ एसटी बसेस घेण्यात आल्या आहेत.
अलिबाग : येत्या २३ एप्रिल रोजी होणाºया मतदानाकरिता, रायगड लोकसभा मतदारसंघातील एक हजार ९६६ ग्रामीण व १९६ शहरी अशा एकूण दोन हजार १६२ मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे व संबंधित साधनसामग्रीसह मतदान अधिकारी, कर्मचारी व पोलीस यांना २१ व २२ एप्रिल रोजी घेऊन जाण्याकरिता तसेच २३ एप्रिल रोजी मतदान संपल्यानंतर या सर्वांना संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयात परत घेऊन येण्याकरिता राज्य परिवहन मंडळाच्या रायगड जिल्ह्यात तब्बल ६२८ एसटी बसेस घेण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा करार राज्य परिवहन मंडळाबरोबर ८ एप्रिल रोजी करण्यात आला असल्याची माहिती रायगडचे उप जिल्हाधिकारी तथा परिवहन व्यवस्थापन समिती प्रमुख जयराज देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात राज्य परिवहन मंडळाच्या ७१२ एसटी बसेसचा वापर निवडणूक यंत्रणा करणार आहे. यापैकी ६२८ एसटी बसेस रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या चार विधानसभा क्षेत्राकरिता राज्य परिवहन मंडळाचा रायगड विभाग पुरविणार आहे तर दापोली व गुहागर या विधानसभा मतदारसंघाकरिता ८४ बसेस राज्य परिवहन मंडळाचा रत्नागिरी विभाग पुरवणार आहे. रायगड एसटी विभागाकडून पुरविण्यात येणाºया ६२८ एसटी बसेसमध्ये ५४८ मोठ्या एसटी बसेस तर ८० मिनी बसेसचा समावेश राहणार आहे.
>दोन दिवस होणार गैरसोय
२२ व २३ एप्रिल रोजी रायगड एसटी विभागाच्या सर्वाधिक एसटी बसेस निवडणूक यंत्रणेच्या सेवेकरिता देण्यात येणार असल्याने रायगड एसटी विभागाच्या दैनंदिन एकूण १५०० प्रवासी सेवा फेऱ्यांपैकी तब्बल ९० टक्के प्रवासी फेºया रद्द कराव्या लागणार आहेत.
परिणामी, या दोन दिवशी प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. परिणामी, या दिवशी प्रवाशांनी शक्यतो आपला एसटी प्रवास टाळावा किंवा त्या अनुषंगाने प्रवासाचे आगाऊ नियोजन करावे, असे आवाहन या निमित्ताने राज्य परिवहन मंडळाचे रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केले आहे.
>रायगड एसटी विभाग बसेस नियोजन
विधानसभा बस प्रकार २१ एप्रिल २२ एप्रिल २३ एप्रिल २३ एप्रिल एकूण
मतदारसंघ (दिवसा) (रात्री)
पेण मोठी २१ ४१ ४१ २१ १२४
मिनी बस ०० १७ १७ ०० ३४
अलिबाग मोठी १६ ५२ ५२ २३ १४३
मिनी बस ०० ०० ०० ०० ००
श्रीवर्धन मोठी २६ ४६ ४६ २३ १४१
मिनी बस ०० ०७ ०७ ०० १४
महाड मोठी २९ ४३ ४३ २५ १४०
मिनी बस ०० १६ १६ ०० ३२
एकूण ९२ २२२ २२२ ९२ ६२८