मुरुडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९७ अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:52 AM2017-10-04T01:52:21+5:302017-10-04T01:52:34+5:30
ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०१७ करिता वावडुंगी, वेळास्ते, तेलवडे, कोर्लेई, काकळघर या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ९९ अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची छाननी मुरुड, दरबार हॉल येथे करण्यात आली.
आगरदांडा : ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०१७ करिता वावडुंगी, वेळास्ते, तेलवडे, कोर्लेई, काकळघर या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ९९ अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची छाननी मुरुड, दरबार हॉल येथे करण्यात आली.
वावडुंगी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाकरिता आठ तर सरपंचपदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते.त्या अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष वाणी यांनी केली. सरपंचपदाचे उमेदवार हरिश्चंद्र भेकरे यांनी दुसरे सरपंच पदाचे उमेदवार दशरथ वाजे यांच्याविरोधात लेखी तक्र ार केली. दशरथ वाजे यांचे मुरु ड नगरपरिषद वॉर्ड क्र मांक ७ या ठिकाणी त्यांचे नाव आहे. त्यासंदर्भात लेखी तक्र ार दाखल करण्यात आली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाºयांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १३ नुसार जर एखाद्या व्यक्तीचे नाव मतदारांच्या यादीत असल्याने तो अर्ज वैध ठरविण्यात येतो असे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष वाणी यांनी तक्र ारदारांना सांगितले. सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यावेळी सर्व उमेदवार सदस्य व सरपंच सदस्य हजर होते.
वेळास्ते ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४ सरपंचपदासाठी तर १५ सदस्यपदासाठी अर्ज दाखल झाले होते.त्या अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी नारायण गोसावी यांनी केली असता त्यावेळी सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. त्याप्रसंगी सर्व सदस्य व सरपंच उमेदवार उपस्थित होते. तेलवडे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी ४ तर सदस्यपदासाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश खिलारे यांनी केली असता ते सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले. कोर्लेई ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७ सरपंचपदासाठी तर ३६ सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश वारगे यांनी केली असता सरपंच पदाकरिता आलेले सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले. तसेच सदस्यपदासाठी प्रभाग ३ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग यामधून अलका पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. बाकी सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहे.
काकळघर ग्रामपंचायत सरपंचपदासाठी ४ तर २६ सदस्यपदासाठी अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी किशोर माळी यांनी केली. सदस्यपदाकरिता प्रभाग ३ मधून सर्वसाधारण स्त्रियांमधून राखी भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु तो अर्ज आॅनलाइन करताना बी.सी.सी.राखीव जागेकरिता भरल्यामुळे तो अर्ज अवैध ठरविण्यात आला. बाकी सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले. यावेळी तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार दिलीप यादव उपस्थित होते.
महाडमध्ये पाच उमेदवारांचे अर्ज बाद
महाड : तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यपदासाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी पाच उमेदवारी अर्ज मंगळवारी छाननीत बाद झाले. सदस्यपदासाठीचे चार तर सरपंचपदासाठीचा एक अर्ज बाद झाला.
ग्रामपंचायतींमध्ये ७३ सरपंचपदासाठी २१० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तर ५४९ सदस्यांसाठी ९२१ उमेदवारी अर्ज दाखल होते. सरपंचपदासाठी अर्ज दाखल केलेल्या अर्जापैकी नांदगाव बुद्रुक येथील एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. तर सदस्य पदासाठी दाखल झालेले चार अर्ज अवैध ठरविण्यात आले.
यात करंजाडी, नडगांव तर्फे बिरवाडी, फौजी आंबावडे आणि गोठे बुद्रुक येथील प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली.