शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

रायगडमध्ये ९९.५७ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 2:32 AM

४६७ मतदारांनी बजावला हक्क : कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक

अलिबाग : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी निवडणूक पार पडली. रायगड जिल्ह्यात ९९.५७ टक्के विक्रमी मतदान झाले. ४६७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये २३७ स्त्री आणि २३० पुरुष मतदारांचा समावेश आहे. आठपैकी सहा मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाले, तर पनवेल आणि कर्जत येथे प्रत्येकी एका मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांचे राजकीय भवितव्य सोमवारी मतपेटीमध्ये बंद झाले. २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतरच कोण विजयी होणार हे स्पष्ट होणार आहे.सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतदान सायंकाळी चार वाजता संपले. कर्जत आणि पनवेल तालुक्यातील प्रत्येकी एका मतदाराने मतदान केले नाही. तर अलिबाग, महाड, माणगाव, पेण, रोहा आणि श्रीवर्धनमधील १०० टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.रायगड जिल्ह्यात ४६९, रत्नागिरी २५९ आणि सिंधुदुर्ग २१२ असे एकूण ९४० मतदार आहेत. शिवसेना आणि भाजपाच्या मतांची बेरीज केल्यास ४७१ होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, काँग्रेस यांच्या मतांची आकडेवारी ही ४४३ होते. उर्वरित मतेही मनसे आणि अपक्ष यांची आहेत. मतांच्या आकडेवारीवरून युतीचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे विजयाची खात्री साबळे यांना अधिक आहे, परंतु भाजपाने आपल्या पारड्यातील मते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात टाकल्याची चर्चा आहे. त्यामुळे तटकरे यांच्या गोटात आतापासूनच आनंदाचे वातावरण आहे. कोकणात शिवसेनेने चांगलेच बस्तान बसवलेले आहे. केंद्रात आणि राज्यात दोघांची सत्ता असली तरी, दोघेही एकमेकांना पाण्यात बघतात हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे साबळे यांच्या रूपाने आणखी एक आमदार कोकणात निवडून येणे भाजपाला नको असल्याचे बोलले जाते. त्याच कारणासाठी आघाडीचे उमेदवार तटकरे यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपाच्या काही मतदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केल्याची चर्चा आहे. सोमवारी झालेल्या मतदानाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी प्रशात ठाकूर यांनी, भाजपाच्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याचे त्रोटक उत्तर दिले.कर्जतमध्ये १०३ मतदारांनी हक्क बजावला1कर्जत : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणुकीसाठी कर्जतमध्ये १०४ मतदारांपैकी १०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शेतकरी कामगार पक्षाचा एक मतदार प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानाला येऊ शकला नाही.2स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कर्जत येथील प्रांत अधिकारी कार्यालयात मतदान केंद्र होते. कर्जत, खोपोली, माथेरान या नगरपालिका तसेच खालापूर नगरपंचायतीमधील सदस्य हे या निवडणुकीसाठी मतदार होते. तसेच दोन्ही तालुक्यातील १० जिल्हा परिषद सदस्य आणि दोन्ही तालुका पंचायत समितीचे सभापती-उपसभापती यांचे ४ मतदार या निवडणुकीत मतदान करणार होते. दोन्ही तालुक्यातील १०४ मतदारांना मतदानाचा अधिकार होता.3निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवक कार्यकर्ते अनिकेत सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांना राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष यांनी पाठिंबा दिला आहे तर शिवसेनेकडून राजीव अशोक साबळे हे निवडणूक रिंगणात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे कळंब जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले सुदाम पेमारे यांची प्रकृती बरोबर नसल्याने ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत.भाजपा-राष्ट्रवादी पाठिंब्याची चर्चापनवेल : रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या स्थानिक प्राधिकरणातील नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य आदींना या निवडणुकीत मतदानाचा हक्क असतो. भाजपा रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या भेटीमुळे निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीला मतदान केल्याची चर्चा रंगली होती. पनवेलमध्ये भाजपाचे मतदान पाहता, तटकरे सकाळी १0 वाजल्यापासून पनवेलमध्ये तळ ठोकून होते. उरण, पनवेलचे ११८ मतदान येथील प्रांत अधिकारी कार्यालयात शांततेत पारपडले.

टॅग्स :ElectionनिवडणूकVidhan Parishadविधान परिषद