शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

थेट सरपंचपदासाठी 'मनी ॲन्ड मसल' पॉवरचा आधार

By निखिल म्हात्रे | Published: November 02, 2023 12:59 PM

पाणी, गटार, रस्ते या मूलभूत गरजांबरोबरच गावाला विकासात्मक चेहरा देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग - ग्रामपंचायत निवडणुकीची प्रचार आता संपला असुन सदस्य पदासाठी इलेक्टिव्ह मेरिट असले तरी सरपंच पदासाठी मात्र मनी ॲन्ड मसल' हाच निकष लावला जात असल्याने विकासाची दृष्टी असणारी माणसं या प्रक्रियेत येणार का?, हा खरा प्रश्न आहे.

पाणी, गटार, रस्ते या मूलभूत गरजांबरोबरच गावाला विकासात्मक चेहरा देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मिळतो. या पैशाचा विनियोग चांगल्या प्रकारे करुन खरे तर गावचे रुपडे पालटण्याची दृष्टी असणारी माणसं निवडून जाणं अपेक्षित असते. मात्र, सध्याच्या निवडणुकांचे स्वरुप व पैशांचा वापर पाहता अनेक ठिकाणी प्रतिष्ठेसाठी निवडणुका लढवल्या जातात.चांगला उमेदवार निवडणे महत्त्वाचे -राजकारणात इलेक्टिव्ह मेरिटला महत्त्व असले तरी ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर प्रभागातील समस्यांसाठी किती वेळ देईल, हेही मतदारांनी पाहणे अपेक्षित आहे. त्यात थेट सरपंच निवडीने सदस्यांचे महत्त्व कमी झाले आहे. सरपंचावर सदस्यांचा दबावच राहत नाही, त्यामुळे सरपंच सांगेल त्याप्रमाणेच निधीचे वाटप होते, परिणामी विकासाचा समतोल राहत नसल्याचे गेल्या पाच-सात वर्षात निदर्शनास आले आहे. यासाठी सरपंच पदावर तशी दृष्टी असणारी व्यक्ती निवडून जाणे गरजेचे आहे. मात्र अलीकडे ही दृष्टी मागे पडत चालली असून मनी, मसल पॉवर हाच निकष सगळीकडे लावला जात आहे.आपल्यातील परके कोण ? समजणारी निवडणूक आपल्यातील परके कोण व परक्यातील आपलं कोण?, हे समजायचे झाले तर ग्रामपंचायत निवडणूक लढवावी लागते. बहुतांश ठिकाणी जवळचेच लोक टांग मारत असल्याने या लोकांकडे अधिक लक्ष ठेवावे लागते.आणाभाका सुरु....सहकारी संस्थांची अथवा ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की, आणाभाका आल्याच. त्यातही ग्रामपंचायतीची निवडणूक दहा-वीस मतांवर असल्याने आणाभाका जोरात असतात. गावातील सामाजिक प्रश्नाची चांगली जाण असणारे अनेक तरुण ग्रामपंचायतीमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते रिंगणाबाहेरच राहीले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत