लग्नाहून परतणाऱ्या बसला मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनरची धडक; १ ठार, २२ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 08:45 AM2022-12-19T08:45:28+5:302022-12-19T08:45:55+5:30

सिंधुदुर्गला गेलेली बस शहापूर-वाशिंदला परतत होती. तेव्हा खोपोलीजवळ एका कंटेनरने बसला पाठीमागून धडक दिली.

A bus returning from a wedding was hit by a container on the Mumbai-Pune highway; 1 killed, 22 injured | लग्नाहून परतणाऱ्या बसला मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनरची धडक; १ ठार, २२ जखमी

लग्नाहून परतणाऱ्या बसला मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनरची धडक; १ ठार, २२ जखमी

Next

भालचंद्र जामलेदार

खोपोली - मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीनजीक भीषण अपघात झाला आहे. सिंधुदुर्गाला लग्नाचं वऱ्हाड घेऊन गेलेल्या खासगी बसला कंटनेरनं पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या धडकेत बसचा मागचा भाग पूर्णपर्ण तुटला आहे. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील प्रवासी जखमी आहेत. 

सिंधुदुर्गला गेलेली बस शहापूर-वाशिंदला परतत होती. तेव्हा खोपोलीजवळ एका कंटेनरने बसला पाठीमागून धडक दिली. यावेळी बसमध्ये ३५ प्रवासी होते. त्यातील २२ प्रवासी जखमी आहेत. यातील ४ प्रवाशांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात नेले असून त्यातील एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे. तर १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी असून त्यांच्यावर घटनास्थळी प्राथमिक उपचार केले आहेत. तर अन्य ६ जखमींवर खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: A bus returning from a wedding was hit by a container on the Mumbai-Pune highway; 1 killed, 22 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.