मतदानाची रील्स बनविणे आले अंगाशी, एकावर गुन्हा दाखल
By निखिल म्हात्रे | Published: May 7, 2024 08:48 PM2024-05-07T20:48:06+5:302024-05-07T20:53:17+5:30
याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग - रेवदंडा हद्दीतील मतदान केंद्रावर मतदान करताना व्हिडीओ शुटींग काढून रिल्स बनवून स्टेटस ठेवणे एकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात निवडणुकीदरम्यान घडलेली पहीलीच घटना आहे.
रायगड लोकसभा निवडणूकीची मतदान प्रक्रीया सुरु असताना रेवदंडा येथील त्यांचे मतदान केंद्र क्रमांक २४४ येथे मतदार प्रसाद शरद गोंधळी यांनी एका विशिष्ठ उमेदवारास मतदान करीत असल्याची व्हिडीओ बनवुन तिची रिल्स तयार केली होती. ती रील्स स्वतःच्या ईस्टाग्राम, व्हॉट्सअपवर प्रदर्शीत केली.
मतदान प्रक्रिया गुप्ततेचा भंग केल्याने प्रसाद शरद गोंधळी यांचे विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात सरकार तर्फे फिर्याद देवुन अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच सीआरपीसी १४९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.