अलिबाग - थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करून अनेक जण मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवतात. यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी काही वर्षांपासून थर्टी फर्स्टची रात्र पोलिसांना बंदोबस्तावर घालवावी लागत आहे. त्यानुसार यंदाही वाहतूक पोलीसांसह स्थानिक पोलीस कारवाईसाठी सज्ज झाले असून जागोजागी बंदोबस्त लावण्यात येणार आहे.
मागील काही वर्षांत सण उत्सवाप्रमाणेच थर्टी फर्स्टला महत्त्व प्राप्त झाले आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. यासाठी खाण्या-पिण्याच्या पाट्यांचेही आयोजन केले जाते. त्यात काही तरुणांसह नियमित नशा करणाऱ्या तळीरामांचा अधिक भर हा पिण्यावरच असतो. त्यांच्याकडून नशा केल्यानंतरही दुचाकी अथवा कार चालवल्या जातात. यामुळे मागील काही वर्षात थर्टी फर्स्टच्या रात्री अपघाताच्या घटना घडल्या आहेत. परिणामी अशा अपघातांना आळा घालण्यासाठी 31 डिसेंबरची रात्र पोलिसांना बंदोबस्तावर घालवावी लागत आहे. पोलिसांकडूनही या दिवशी जागोजागी बंदोबस्त लावून वाहनांची झाडाझडती घेतली जाते. त्यामध्ये नशा करून वाहन चालवताना आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाते. त्याशिवाय वाहतुकीचे इतर नियम तोडणाऱ्यांनादेखील पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते.पाच वर्षांचे आकडे काय सांगतात?2020 -वर्षाच्या अखेरच्या दिवशी ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या 320 कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक नशा केलेल्या चालकांना नववर्षाची सुरुवात दाखल गुन्ह्यांची करावी लागली होती.2021 - नववर्षाचे स्वागत नशापान करून नव्हे तर शुद्धीत राहून कुटुंबासह साजरे करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यानंतरही 31 डिसेंबर धुंदीत साजरा करून वाहन चालवणाऱ्या 250 चालकांवर कारवाई केली होती.2022 - थर्टी फर्स्टच्या रात्री तब्बल 500 चालकांवर कारवाई केली होती. त्यात 187 वाहनचालकांनी मद्यपान केल्याचे आढळल्याने त्यांच्यावर ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई केली होती. नाकानाक्यावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. तसेच दंडात्मक कारवाई पण केली.2023 -31 डिसेंबर 2020 च्या रात्री इक अॅण्ड ड्राइव्हच्या 25 कारवाया करण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे आलेल्या निर्बंधामुळे हॉटेल, बार यांना निर्बंध होते. त्यामुळे तळीरामांना फारशी संधी न मिळाल्याने कारवा31 डिसेंबरची रात्र -अनेक जण थर्टी फर्स्ट म्हणजे सृष्टीचा अखेरचा दिवस असल्याचा आव आणत मद्यपान करत असतात. मात्र त्यानंतरही ते नशा करणारच असल्याने एकाच दिवशी नियंत्रण सुटेपर्यंत नशा का करायची, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.