जेएनपीएच्या शॅलो वॉटर बंदरात २२ हजार मेट्रिक टन मालाचे महाकाय जहाज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 06:27 PM2023-08-18T18:27:06+5:302023-08-18T18:27:16+5:30
टाटा कंपनीच्या कोल्ड रोल स्टील कॉईल घेऊन बंदरात पोहोचले आहे
मधुकर ठाकूर
उरण : येथील जेएनपीए अंतर्गत असलेल्या खासगी जे.एम.बक्सी बंदरात २२ हजार मेट्रिक टन मालाचे महाकाय मालवाहू जहाज दाखल झाले आहे.एम.व्ही. व्हिटीआरई नावाचे महाकाय जहाज ओरिसा येथील पॅरादीप बंदरातुन जेएनपीए अंतर्गत असलेल्या खासगी जे.एम.बक्सी बंदरात गुरुवारी (१७) दुपारी दीड वाजताच्या सुमारास दाखल झाले आहे.
टाटा कंपनीच्या कोल्ड रोल स्टील कॉईल घेऊन बंदरात पोहोचले आहे. जहाजाचे यशस्वी लॅण्डींग केलेल्या कॅप्टन आणि कर्मचाऱ्यांचे जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी स्वागत केले.याप्रसंगी जेएनपीएचे विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.