चिरनेरमध्ये सापडलेल्या साडेनऊ फूट लांबीच्या अजगराला जंगलात सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 08:52 AM2022-08-08T08:52:52+5:302022-08-08T08:53:31+5:30
- मधुकर ठाकूर उरण : चिरनेर -उरण येथील शेतघरात भक्षाच्या शोधार्थ आलेल्या साडेनऊ फूट लांबीच्या इंडियन रॉक पायथॉन जातीच्या ...
- मधुकर ठाकूर
उरण : चिरनेर -उरण येथील शेतघरात भक्षाच्या शोधार्थ आलेल्या साडेनऊ फूट लांबीच्या इंडियन रॉक पायथॉन जातीच्या अजगराची वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सदस्य राजेश पाटील यांनी शिताफीने पकडून जंगलात सोडून दिले.
चिरनेर -उरण गावचे रहिवासी असलेल्या उदय मोकल यांच्या शेतघराच्या बाजूला रविवारी (७) रात्रीच्या सुमारास एक साडेनऊ फूट लांबीचा इंडियन रॉक पायथॉन जातीचा अजगर भक्षाच्या शोधार्थ आला होता.कोबड्या आरडाओरडा का करतात हे पाहाण्यासाठी घराच्या ओसरीत आल्यावर मोकल यांना समोरच साडेनऊ फुटी लांबीच्या अजगराचे धूड नजरेत पडले. रात्रीच्या वेळीच भल्यामोठ्या अजगराला पाहून क्षणभर मोकल यांची बोबडीच वळली. भांबावलेल्या मोकल यांनी सर्पमित्रांना पाचारण केले. वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे राजेश पाटील यांनी साडेनऊ फुटी लांबीच्या अजगराला शिताफीने पकडले आणि त्याला नैसर्गिक आवासात सोडून दिले.