उरणच्या युवा आगरी व्यावसायिकाचा जपानमध्ये डंका : यशस्वी उद्योजक अवार्डने सन्मानित 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 05:10 PM2023-11-08T17:10:46+5:302023-11-08T17:11:56+5:30

मान्यवरांच्या हस्ते यशस्वी उद्योजक म्हणून समीर पाटील यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

A young aagri businessman from Uran makes his mark in Japan: Honored with the Success Entrepreneur Award | उरणच्या युवा आगरी व्यावसायिकाचा जपानमध्ये डंका : यशस्वी उद्योजक अवार्डने सन्मानित 

उरणच्या युवा आगरी व्यावसायिकाचा जपानमध्ये डंका : यशस्वी उद्योजक अवार्डने सन्मानित 

मधुकर ठाकूर

उरण : भारतात अनेक प्रतिभाशाली उद्योजक झालेत व होत आहेत. पण या सर्वामध्ये सर्वात कमी वयात सर्वात जास्त यशस्वी झाला आहे तो म्हणजे आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे संस्थापक समीर पाटील. या आगरी युवकांनी वयाच्या २२ व्या वर्षी आर्यन ग्रुप आँफ कंपनीची स्थापना केली व पाच वर्षाच्या आतही कंपनी बंदर,गोदी क्षेत्रात मालाची ने- आण करणारी व्यवसायातील धाडसी कंपनी बनली. अशा या आर्यन ग्रुप आँफ कंपनीचा सन्मान जपान येथे टाटा समूहाच्या माध्यमातून मंगळवारी (७) उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी उद्योजक म्हणून समीर पाटील यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

उरण तालुक्यातील चिर्ले या लहानशा खेडेगावातील समीर पाटील यांचा जन्म झाला.शाळा,काँलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता उद्योग क्षेत्रात उतरावे या महत्वकांक्षी संकल्पनेतून समीर पाटील या आगरी युवकांनी २००४ साली आर्यन ग्रुप आँफ कंपनीची स्थापना केली.आज बंदर,गोदी क्षेत्रात मालाची ने- आण करणारी व्यवसायातील धाडसी कंपनी बनली असून समीर पाटील या तरुणांनी खेड्यापाड्यातील अनेक तरुणांना आपल्या आर्यन ग्रुप आँफ कंपनीत रोजगारांची संधी उपलब्ध करून दिली आहे.त्यांच्या या उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल बंदर,गोदी येथील टाटा समूहाच्या जपानी शिष्टमंडळाने घेऊन आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे संस्थापक समीर पाटील यांना यशस्वी उद्योजक म्हणून यशस्वी उद्योजकांचा अवार्ड  मंगळवारी ( दि.६) जपान येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देऊन गौरविण्यात आले आहे.

समिर पाटील या आगरी युवकांनी देश पातळीवर नव्हे तर परदेशातही आपल्या कंपनीचा यशस्वी उद्योजक म्हणून डंका वाजवल्याने अनेक व्यावसायीक, उद्योगपती,उरण तालुक्यातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले आहे.

Web Title: A young aagri businessman from Uran makes his mark in Japan: Honored with the Success Entrepreneur Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.