दुचाकीवर आशिया युरोपच्या वारीवर असलेल्या नवी मुंबईच्या तरुणाला युद्धाचा फटका
By वैभव गायकर | Published: October 9, 2023 03:07 PM2023-10-09T15:07:54+5:302023-10-09T15:10:22+5:30
युद्धामुळे इस्त्रायलच्या शेजारील देशात देखील योगेशला प्रवास करता येणार नसून तुर्की,जॉर्जिया,अर्मानिया ,इराण,दुबई मार्गे योगेश भारतात येणार आहे.
पनवेल - वसुदेव कुटुंबकमचा संदेश देण्यासाठी 5 ऑगस्ट रोजी नवी मुंबई मधुन आशिया - युरोप खंडातील विविध देशांना भेटी देणाऱ्या नवी मुंबईतील योगेश आळेकर या दुचाकीसाराला इस्त्रायल हमास युद्धाचा फटका बसला आहे.65 दिवसाच्या प्रवासात हजारो किमीच अंतर योगेशने पार केला असुन तब्बल 30 देशांना भेटी दिल्या आहेत.परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असुन ईजिप्त इस्त्रायल जॉर्डन या देशामध्ये योगेशला प्रवास करता येणार नाही.
युद्धामुळे इस्त्रायलच्या शेजारील देशात देखील योगेशला प्रवास करता येणार नसून तुर्की,जॉर्जिया,अर्मानिया ,इराण,दुबई मार्गे योगेश भारतात येणार आहे. युद्धस्थितीच्या परिणाम प्रवासावर झाला असुन अनेक देशातील ट्रान्झिट व्हिसासाठी योगेशला अडथळा येत आहे.120 दिवसाच्या प्रवासात 65 दिवस पूर्ण झाले असुन या परिस्थितीचा फटक्यामुळे 15 ते 20 दिवस आणखी उशीर होऊ शकतो असे योगेश आळेकर चे म्हणणे आहे.
सध्या योगेश बल्गेरिया मध्ये प्रवासात आहे.इस्त्रायल युद्धाचे परिणाम पूर्ण मध्य इस्ट वर पडणार असल्याचे योगेशचे म्हणणे आहे.या प्रवासात योगेशने अनेक देशांना भेटी दिल्या आहेत.त्या देशांची संस्कृती,चालीरीती लोकांची वागणूक याचा अनुभव जवळून योगेशला घेता आला आहे.दरम्यान इस्त्रायल सारख्या ऐतिहासिक देशाला जाण्याची योगेशची मनापासूनची ईच्छा होती.त्याठिकाणच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचे नियोजन योगेशने केले होते.मात्र त्याच्या ऐतिहासिक प्रवासात त्याला इस्त्रायल देशाला भेट देता येणार नसल्याची खंतही योगेशने व्यक्त केली.60 दिवसांच्या प्रवासा नंतर मध्येच उडालेला युद्धाचा परिणाम अशाप्रकारे योगेशच्या प्रवासावर होणार आहे.