शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

रायगड जिल्ह्यातील सखी केंद्र पीडित महिलांसाठी ‘आधारवड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 11:06 PM

अलिबाग येथे कें द्र: कौटुंबिक वादासह, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारासह अन्य किचकट ८६६ प्रकरणे सोडविण्यात यश

निखिल म्हात्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुली, महिलांना वेळेत मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘सखी’ केंद्रात येणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अलिबाग येथे सुरू झालेल्या या केंद्रात कौटुंबिक वादासह, अल्पवयीन मुलींवरील अत्यारासह अन्य किचकट अशी ८६६ प्रकरणे सोडविण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सखी केंद्र हे पीडित मुली, महिलांसासाठी आधारवड ठरत असल्याचे दिसून येते.

दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर केंद्र शासनाने संकटग्रस्त महिलांच्या मार्गदर्शनासाठी महिला आणि बाल विकास विभागाच्या अंतर्गत ‘सखी’ केंद्र सुरू करण्याचा निर्णय २०१२ मध्ये घेतला. महाराष्ट्रात अशा प्रकारे ११ केंद्र सुरू झाली असून, त्यातील एक अलिबाग येथे कार्यान्वित झाले आहे. रायगड जिल्ह्यातील विशेषत: आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या प्रकरणांमुळे रायगड जिल्ह्यात ‘सखी’ संकटग्रस्त व अत्याचार झालेल्या महिलांसाठी मदतकेंद्राची जास्त गरज भासत होती.

रायगड पोलिसांकडे वर्षाला सरासरी १७ ते २० अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या तक्र ारी दाखल होतात. कायद्याने गर्भपात करता येत नसल्याने यातील काही मुलींना बालवयात बाळाला जन्म द्यावा लागतो. अशा अत्याचारित अल्पवयीन मुलींना समाजात कोणतेही स्थान नसल्याने त्यांचे जगणे कठीण होत असते. बहुतांश वेळी या महिला आर्थिकदृष्ट्या सबळ नसतात. त्यांना बाळंतपणाचा खर्च, पोलीस ठाण्याच्या फेºया मारणे शक्य नसते. न्यायालयात दाद मागणे दूरच असल्याने या पीडितांना सखी केंद्राच्या मार्फत मदत केली जाते. पीडित महिलांना आत्मनिर्भयपणे ओढावलेल्या संकटाचा सामना करावा, हा मुख्य उद्देश या केंद्राचा आहे.

जून २०१७ मध्ये कार्यान्वित१रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात महिला व बालविकास विभागाचे सखीकेंद्र हे पीडित, संकटग्रस्त महिलांसाठी खरेखुरे आधारवड ठरले आहे. जून २०१७ मध्ये हे केंद्र कार्यान्वित झाले आहे. मागील अडीच वर्षांत ९८६ प्रकरणे केंद्राकडे झाली होती. यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या ८६६ प्रकरणांमध्ये पती-पत्नीत समुपदेशन करून तडजोड घडवून त्यांचे संसार पुन्हा सुरळीत केले आहेत.२या केंद्राकडे येणाºया पीडित महिलेला चार ते पाच दिवस मोफत निवास सुविधा दिली जाते. सॅनिटरी किट, जेवण व कपड्यांची व्यवस्था केली जाते. तिच्या निवास भोजनाची अन्यत्र कोठेही सोय होत नसेल, तर तिची सोय शासकीय महिला वसतिगृहात करून तिचे पुनर्वसन केले जाते. आतापर्यंत सहा पीडित महिलांची व चार बालकांची शासकीय महिला वसतिगृहात व बालगृहात निवास सुविधा देण्यात आली आहे.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्धच्जलद गतीने पोलीस कारवाई होण्यासाठी आणि न्यायालयीन कामकाज जलद गतीने होण्यासाठी सखी हे पीडित महिलांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा पुरविते.च्या सुविधेमुळे पीडित महिला सखीकेंद्रातूनच पोलिसांना, न्यायालयास त्यांचा जबाब देऊ शकते. जबाब देण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयात जाण्याची गरज पडत नाही.सखी केंद्रामार्फत १२ महिलांना मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच या केंद्रामार्फत २१ पीडित महिलांना मनोधैर्य योजनेचा लाभ मंजूर करून दिला आहे. तसेच पालक नसलेल्या अथवा एक पालकत्व असलेल्या ११ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. तसेच पीडित महिलांचे पुनर्वसन करताना त्यांना विविध शासकीय योजनांचाही लाभ मिळवून देत सखीकेंद्र निराधार पीडित महिलांसाठी खरेखुरे आधारवड ठरले आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगRapeबलात्कार