'आई तुझं देऊळ' फेम सचिन ठाकूर यांची कार अज्ञातांनी दुसऱ्यांदा जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2023 03:41 PM2023-08-09T15:41:45+5:302023-08-09T15:42:22+5:30

कामावरून आल्यावर रात्री सचिन ठाकूर यांनी त्यांची चारचाकी घराजवळ उभी होती.

'Aai Tuja Deul' fame Sachin Thakur's car was burnt by unknown persons for the second time | 'आई तुझं देऊळ' फेम सचिन ठाकूर यांची कार अज्ञातांनी दुसऱ्यांदा जाळली

'आई तुझं देऊळ' फेम सचिन ठाकूर यांची कार अज्ञातांनी दुसऱ्यांदा जाळली

googlenewsNext

 मधुकर ठाकूर 

उरण - उरण तालुक्यातील जसखार येथील आगरी- कोळी समाजातील  कलाकार व  "आई  तुझं देऊळ "फेम सचिन  ठाकूर यांची चारचाकी गाडी मंगळवारी  (८) मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात गावगुंडानी पुन्हा एकदा आग लाऊन जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी न्हावा-शेवा पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामावरून आल्यावर रात्री सचिन ठाकूर यांनी त्यांची चारचाकी घराजवळ उभी होती. मंगळवारी (८)  मध्यरात्रीच्या १.३० वाजताच्या सुमारास शेजाऱ्यांनी मोबाईलवरून संपर्क साधत मारुती कार जळत असल्याची माहिती दिली.सचिन ठाकूर यांनी जळत्या गाडीपाशी त्वरेने धाव घेतली.त्यांनी आणि शेजाऱ्यांनी बालदीने पाणी मारुन चारचाकीला लागलेली आग विझवून टाकली.मात्र गाडीतील सीएनजीच्या सिलिंडरला आग लागली असती तर गाडीच्या शेजारीच आणखी तीन ऑटोरिक्षा उभ्या असल्याने मोठी दुर्घटना घडली असती.सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसल्याने अनर्थ टळला आहे.कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चारचाकी गाडीच्या मागील चाकावर नुकसान करण्याच्या वाईट हेतूने ज्वलनशील पदार्थ टाकला असल्याचे सचिन ठाकूर यांनी न्हावा -शेवा बंदर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

याधीही ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर काही अज्ञात गावगुंडांनी गाडीला आग लावली होती.मात्र पोलिसांना त्याचा सुगावा लावता आलेला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा जसखार येथील आगरी- कोळी समाजातील  कलाकार व  "आई  तुझं देऊळ "फेम सचिन  ठाकूर यांची चारचाकी गाडी मंगळवारी  (८) मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात गावगुंडानी पुन्हा एकदा आग लाऊन जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस  अधिक तपास करीत आहेत

Web Title: 'Aai Tuja Deul' fame Sachin Thakur's car was burnt by unknown persons for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.