आमटी, वरणाच्या फोडणीचा गृहिणींना लागतोय ठसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 01:12 AM2019-11-08T01:12:55+5:302019-11-08T01:13:21+5:30
लसणाचे द्विशतक : कोथिंबीर ९० पार, तर कांदा ८० च्या घरात
अलिबाग/पेण/दासगाव : परतीच्या पावसाने पिक नष्टी झाली आहेत. बाजारपेठांमध्ये आवक घटल्याने आता पालेभाज्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. कांदा ८० च्या घरात गेला आहे, तर कोंथींबीरच्या एका जुडीने नव्वदी पार केली आहे. लसणाने द्वीशतक ठोकल्याने आमटी आणि वरणाच्या फोडणीचा गृहीणींना ठसका लागत आहे. पावसाचे सावट पुढील काही दिवस असेच राहील्यास सर्वसमान्यांना पालेभाज्या खरेदी करणे मुश्कील होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी आणि परतीच्या पावसाने चांगलाच हाहाकार उडवून दिला आहे. पावसाचा फटका हा शेतीला मोठ्या प्रमाणात बसल्याने उभ्या शेतातील पीक वाया गेले आहे. पावसाच्या तडाख्यापासून पालेभाज्याही वाचू शकलेल्या नाहीत. त्यामुळे बाजारपेठेमध्ये पाल्याभाज्यांना मागणी आहे मात्र उत्पादनावरच थेट परिणाम झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात आवक कमालीची घटली आहे. पाल्याभाज्या या नियमीतपणे जेवणामध्ये वापरल्या जातात. आवक घटल्याने पालेभाज्यांचे दरही चांगलेच कडाडले आहेत. कोथींबीरच्या जुडीने १०० गाठली आहे, तर कांदा हा किलोला ८० रुपयांच्या घरात गेला आहे. लसूण २०० रुपये किलोने विकला जात आहे. मिरचीचा दर हा ६० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे आमटी आणि वरणाच्या फोडणीेचा ठसका गृहीणींना लागला आहे. दर कडाडले आहेत आणि अशीच परिस्थीत राहील्यास जेवणातून महत्वाच्या भाज्या गायब झाल्यास नवल वाटायला नको.
परतीच्या पावसामुळे शेतातील पिक वाया गेले आहे. त्यामुळे मागणी असूनही तसा पुरवठा होत नाही. त्यामुळे दर कडाडले आहेत, असे एका भाजी विक्रेत्याने सांगितले. पावसाचा कगर सुरुच राहील्यास दरांनेमध्ये आणखी वाढ होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. जेवणामध्ये नियमीतपणे कोथींबीर, मिरची, लसूण, टॉमेटो, कांदा याची आवश्यकता असते. मात्र दर गगणाला भिडल्याने किचन कॅबीनेटमधील बजेट पुरते कोलमडले आहे. काही दिवसांनी आमटी आणि वरणाच्या फोडणीतून हे बाद झाल्यास खमंग फोडणी कशी बसणार अशी खंत अलिबाग येथील स्वप्नाली फोडसे (गृहीणी) यांनी लोकमत जवळ व्यक्त केली.
दरम्यान, पालेभांज्यांचे दर वाढले असताना अद्यापही काही हॉटेल, खानावळ, वडापावचे स्टॉल येथील अन्नपदार्थांच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही.
च्पश्चिम महाराष्ट्रांतील सांगली, कोल्हापुर, पुणे, सातारा, या जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याने खरीप पिका बरोबर भाजीपाल्याचे पीक देखिल पावसामुळे वाहून गेले. त्याचा परिणाम शहरी बाजारपेठेमध्ये झालेला दिसून येत आहे.
च्महाडमध्ये लागणारा भाजीपाला हा वाई, पुणे, सासवड, शिरवळ, निरा येथुन येतो. परंतु गेल्या कांही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीचे उत्पन्न घटले आहे. मुख्य बाजारपेठेत भाजीपाला आणि कांदा आवक थांबल्याने दरामध्ये चाळीस टक्या पेक्षा अधिक वाढ झाली.
पालेभाज्यांचे दर
आताचे दर आधीचे दर
(किलो)रु. (किलो)रु.
कांदा ८० ३०
लसूण २००-२२० १२०
कोथींबीर (जुडी) ८०-१०० २०
हिरवी मिरची ५०-६० २०
बटाटा ३० २०
मटार १४०-१६० १००-१२०
वाल ८०-९० ६०-७०
टॉमेटो ५० ३०-४०
मेथी (जुडी) ४०-५० १५-२०
भेंडी ६०-८० ३०-४०
वांगी ४०-६० ३०-३५