शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

फरार खंडणीखोराला कामोठेतून अटक

By admin | Published: July 07, 2015 11:36 PM

पुणे येथे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला कामोठे येथून अटक करण्यात आली आहे. बिल्डरला खंडणीसाठी धमकावून गोळीबार करून त्याने पळ काढला होता.

नवी मुंबई : पुणे येथे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला कामोठे येथून अटक करण्यात आली आहे. बिल्डरला खंडणीसाठी धमकावून गोळीबार करून त्याने पळ काढला होता. त्यानंतर कामोठे येथे तो लपल्याची माहिती मिळताच पुणे व कामोठे पोलिसांनी संयुक्त कारवाई करून त्याला अटक केली.नीलेश भरम (२७) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून तो मूळचा पुण्यातील वाजेघर गावचा राहणारा आहे. त्याच्यावर पुणे शहर पोलीस ठाण्यात १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. नुकतेच त्याने एका बिल्डरला खंडणीसाठी धमकावत गोळीबारही केला होता. मात्र त्यानंतर तो पुण्यातून फरार झाला होता. अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यांप्रकरणी पुणे पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर कामोठे येथे तो राहत असल्याची माहिती पुणे पोलिसांनी कामोठे पोलिसांना दिली होती. त्यानुसार उपआयुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सकाळी छापा टाकून त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी सांगितले. कारवाईत त्याच्याकडून तीन देशी कट्टे व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. कामोठे सेक्टर ५ येथील देवशिष सोसायटीत चंद्रकांत घाडगे यांच्या घरात नीलेश हा भाड्याने राहत होता. परंतु दोन वर्षांपासून तो त्या ठिकाणी राहत असताना देखील घाडगे यांनी त्याची माहिती पोलिसांना दिलेली नव्हती. (वार्ताहर)