कळंबोली : कर्नाळा अभयारण्यात दरवर्षी एप्रिल-मे असे दोन महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. पशूपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाच्या वतीने अभयारण्यात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पुरेशा पाणीसाठ्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. अभयारण्यात विविध प्रकारचे पशूपक्ष्यांचे वास्तव्य आहे. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. मात्र, लॉकडाउनमुळे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. उन्हाळ्यात अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडतात, येथील तलावातील पातळी खालावते. फेब्रुवारी-मार्च महिन्यांपर्यंत मुबलक पाणी मिळते; परंतु तापमान जसजसे वाढू लागते, तसे एप्रिल महिन्यापासून नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागतात. पाण्यासाठी पशूपक्ष्यांवर भटकंतीची वेळ येऊ नये म्हणून वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी पाणी भरण्यासाठी १५ मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे.रस्ते निर्मनुष्यझाल्याने वानरे सैरभैरमुंबई - गोवा महामार्गावर १६०० मीटर लांबीचा रस्ता हा कर्नाळा अभयारण्य परिसरातून जातो. महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून वानरांना खाण्यासाठी केळी, इतर पदार्थ दिले जातात. त्यामुळे खाण्याच्या ओढीने वानरे मोठ्या प्रमाणात महामार्गालगत येतात. सध्या रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. प्रवाशांकडून खायला मिळत नसल्याने वानरे सैरभैर झाली आहेत.अभयारण्यातील तीन तलावांच्या माध्यमातून बारामाही पाणी उपलब्ध होत आहे. तलावातील गाळउपसा करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाई भासत आहे. पक्षी व प्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध आहे.- पी. पी. चव्हाण, वनक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य
कर्नाळा अभयारण्यातील पाणवठ्यात मुबलक साठाकळंबोली : कर्नाळा अभयारण्यात दरवर्षी एप्रिल-मे असे दोन महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. पशूपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाच्या वतीने अभयारण्यात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पुरेशा पाणीसाठ्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. अभयारण्यात विविध प्रकारचे पशूपक्ष्यांचे वास्तव्य आहे. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. मात्र, लॉकडाउनमुळे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. उन्हाळ्यात अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडतात, येथील तलावातील पातळी खालावते. फेब्रुवारी-मार्च महिन्यांपर्यंत मुबलक पाणी मिळते; परंतु तापमान जसजसे वाढू लागते, तसे एप्रिल महिन्यापासून नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागतात. पाण्यासाठी पशूपक्ष्यांवर भटकंतीची वेळ येऊ नये म्हणून वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रात ३१ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी पाणी भरण्यासाठी १५ मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे.रस्ते निर्मनुष्यझाल्याने वानरे सैरभैरमुंबई - गोवा महामार्गावर १६०० मीटर लांबीचा रस्ता हा कर्नाळा अभयारण्य परिसरातून जातो. महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून वानरांना खाण्यासाठी केळी, इतर पदार्थ दिले जातात. त्यामुळे खाण्याच्या ओढीने वानरे मोठ्या प्रमाणात महामार्गालगत येतात. सध्या रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. प्रवाशांकडून खायला मिळत नसल्याने वानरे सैरभैर झाली आहेत.अभयारण्यातील तीन तलावांच्या माध्यमातून बारामाही पाणी उपलब्ध होत आहे. तलावातील गाळउपसा करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाई भासत आहे. पक्षी व प्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध आहे.- पी. पी. चव्हाण, वनक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य